ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Insurance 2022 | बोंब ठोकल्याने विमा कंपनीला आली जाग! प्रतिलंबित ‘या’ अतिवृष्टीग्रस्तांना पिक विम्याचे वाटप सुरु

Crop Insurance 2022 | शेतकऱ्यांच्या शेतीतील पीक कितीही बहरलं तरी ते सगळं आपल्याच असतं असं नाही. याचं उदाहरण म्हणजे सध्या होणारा अवकाळी पाऊस आणि गेल्या वर्षी होणारी अतिवृष्टी. अगदी हातात तोंडाशी आलेला घास या जुल्मी पावसानं गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या (Crop Insurance 2022) तोंडून हिरावला होता. गेल्या वर्षी राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले. याच नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी पिकावर उतरवलेला विम्याचे (Crop Insurance 2022) पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. आता याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे अमरावतीमधील तब्बल 27 हजार शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. जे शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु पिक विमा काही मिळेना म्हणून राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक होऊन थेट कार्यालयावरच धाड मारत होती. त्याचबरोबर यंदाची होळी शेतकऱ्यांनी तसेच या संघटनाने बोंब ठोकूनच साजरी केली. याच बोंबेमुळे की का होईना पिक विमा कंपन्यांनी मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याचे वाटप सुरू केले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात
तर पीक विम्यासाठी अमरावतीमधील प्रलंबित असलेले 27 हजार शेतकऱ्यांपैकी 6 हजार 129 शेतकऱ्यांना मंगळवारपासून विमा कंपन्यांद्वारे विमा परतावा खात्यात जमा करण्यात येत आहे. आता विम्याचे पैसे खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. खरं तर, वेळेतच हा विमा मिळणं अपेक्षित आहे. परंतु, विमा कंपन्या सतत काढता हात घेत असल्याने शेतकऱ्यांना लवकरात लवकर विम्याची रक्कम मिळत नाही.

किती शेतकऱ्यांचे झाले नुकसान?
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे 14 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर काढणीपश्चात पिकाचे 7 हजार 152 शेतकरी अद्यापही परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील 3 लाख हेक्टरमधील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. ज्यातील 1.26 लाख शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज दाखल केलेले. तर यातील 26,384 अर्ज कंपनीद्वारा विविध कारणांनी नाकारण्यात आले होते. त्याचबरोबर 72 हजार 639 शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी आतापर्यंत 71.94 कोटींचा परतावा पीक विमा कंपनीद्वारा देण्यात आलाय.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The insurance company woke up with the bomb! Allotment of crop insurance to the pending heavy rain victims started

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button