ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Advice | राज्यात विजांसह पावसाची शक्यता! शेतकऱ्यांनो पेरणीपूर्वी जाणून घ्या पिक निहाय कृषी सल्ला

Agricultural Advice | भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार, आजपासून 14 जून 2023 दरम्यान आकाश आंशिक ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 13 व 14 जून 2023 तुरळक ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा पाऊस (Agricultural Advice) होण्याची अधिक शक्यता आहे. चला तर मग वातावरणानुसार पिक निहाय काय कृषी सल्ला (Agricultural Advice) आहे ते जाणून घेऊयात.

वाचा: Gharkul List | आनंदाची बातमी! शासनामार्फत घरकुल योजनेची यादी प्रसिद्ध, ‘अशा’प्रकारे ऑनलाईन डाउनलोड करा एका क्लिकवर…

कृषी सल्ला
पाऊस, वादळी वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे. वाऱ्याचा वेग लक्षात घेता फळबागा व भाजीपाला पिकांना बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा.

शेतीतील मातीचे व्यवस्थापन
पावसाळ्यात शेतातील पाणी जागेवरच मुरविण्यासाठी तसेच अवघावासोबत मौल्यवान मातीचा थर वाहून जाऊ नये म्हणून जमिनीची मशागत (नांगरणी, वखरणी) करताना मुख्य उतारला आडवी किंवा समतल रेषा काढून (कंटूर) या रेषेला समांतर करावी. सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. नवीन लागवड केलेल्या 1 ते 4 वर्ष वयाच्या फळझाडांच्या आळ्यात पाला पाचोळा, गव्हांड्याचे आच्छादन करावे. लहान रोपांवर पऱ्हाटी किंवा तुऱ्हाटीचे छप्पर करावे.

शेतीतील कामे
वाढत्या तापमानाचा अंदाज लक्षात घेता, शेतीमधील महत्वाची कामे ही सकाळी 11 वाजता पूर्वी करण्यास प्राधान्य द्यावे. माती परीक्षणासाठी मातीचे नमुने काढून ते अधिकृत किंवा शासकीय मृदा परीक्षण प्रयोगशाळेत योग्य शुल्कासह पाठवून माती परीक्षण अहवालानुसार पिक परत्वे कृषी निविष्ठा चे नियोजन करावे. शेतकरी बांधवांनीशिफारशीतील बियाणे व बीजप्रक्रियेसाठी साठी लागणारी बुरशीनाशके आणि जीवाणू खताची उपलब्धतता करून ठेवावी.

सोयाबीन
शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाच अवलंब करावा.
या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक
व्यवस्थापन करण्यात मदत होईल

भुईमूग
खरीप भुईमुग लागवडीकरिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन
माती व सेंद्रिसें य पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडीकरिता जमिनीचा 15 ते 20 सेंमीचा थर
भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी 5 टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे.

मुग
मूग पिकाच्या लागवडीकरिता पिकेव्ही मूग-8802, पिकेव्ही ग्रीनगोल्ड (एकेएम 9911) या वाणाची
निवड करावी.

उडीद
उडीद पिकाच्या लागवडीकरिता टीएयु-1, टीएयु-2, पिकेव्ही उडीद-15 आणि पिकेव्ही ब्लॅकगोल्ड या
वाणाची निवड करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Chance of rain with lightning in the state! Farmers know crop wise agricultural advice before sowing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button