ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Sugarcane |अखेर समजल हा! ऊसाला तुरा येण्याची कारणे व उपाय योजना; जाणून घ्या सविस्तर बातमी…

Sugarcane | ऊसाला तुरा येण्याची कारणे व उपाय योजना…

उसाला तुरा येणे शेतकऱ्यासाठी गांभीर्याची गोष्ट आहे.तुरा आलेला ऊस जर शेतामध्ये १.५ ते २ महिन्यांच्या पुढे राहिला तर पांगशा फुटतात, ऊस पोकळ पडण्यास सुरवात होते. त्यातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्‍टोज या विघटित साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे साखर उतारा कमी होतो. त्यामुळे ऊसाला तुरा येऊ नये याची(Agricultural Information) काळजी घ्यावी.

वाचा: काय डोकं लावलंय राव! थेट ऊसाच्या फडातचं शेतकऱ्याने लावला गांजा; पाहताच पोलिसांनाही फुटला घाम

उसाला तुला येण्यास कारणे –

• उसाला तुरा सर्वसाधारणपणे ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात येतात. दिवसाचे तापमान २६ अंश ते २८ अंश सेल्सिअस व रात्रीचे तापमान २२ अंश ते २३ अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के, साडेबारा तासांचा दिवस आणि साडेअकरा तासांची रात्र, प्रकाशाची तीव्रता १०,००० ते १२,००० फूट कॅन्डल्स अशी परिस्थिती किमान १० ते १२ दिवस सलग मिळाल्यास उसामध्ये फुलकळी तयार होऊन तुरा येण्यास कारणीभूत असते.

• शेतात पाणी साचून राहत असेल तरी तुला येण्याचे प्रमाण वाढते.तुरा येण्यास कारणीभूत घटक उसाची जात  उसाच्या सर्व जातीमध्ये तुरा येण्याची क्षमता असते; परंतु जातीनुसार तुरा येण्याच्या प्रमाणात फरक आढळून येतो. काही जातींमध्ये लवकर तर काही जातींमध्ये तुरा उशिरा येतो. तुरा येण्याचे प्रमाण हे त्या जातीच्या (Agricultural Information) अनुवंशिक गुणांवर अवलंबून असते.

• ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवले जाते, पाण्याचा निचरा योग्य होत नाही, अशा पाणथळ जमिनीतील उसाला जास्त प्रमाणात तुरा येतो. भारी जमिनीत उशिरा तर हलक्‍या जमिनीत लवकर तुरा येतो. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये पाणी साठून राहणाऱ्या जमिनीमध्ये नत्राची उपलब्धता जरी असली तरी त्याचे शोषण पिकाच्या मुळाद्वारे योग्य प्रमाणात न झाल्यामुळे, तसेच जास्त पाऊस असणाऱ्या भागामध्ये उथळ (Agricultural Information) आणि निचऱ्याच्या जमिनीमध्ये असलेला नत्राचा ऱ्हास झाल्यामुळे पिकाच्या शाखीय वाढीसाठी आवश्‍यक असणारे नत्राचे प्रमाण कमी होते. अशा ठिकाणी उसाला जास्त प्रमाणात व लवकर तुरा येतो.

लम्पी आजारामुळे दुधाची होणार दरवाढ; पण कुणी तरी चारा देत का चारा अशी अवस्था होणार

• लागवडीचा हंगाम  सुरू आणि पूर्वहंगामी हंगामात उसाची लागवड (Agricultural Information) केली तर सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात उसाला तुरा येतो. तथापि मे/ जूनमध्ये लागवड केलेला ऊस ऑगस्ट/ सप्टेंबर या काळात कांड्या सुटण्याच्या अवस्थेत असतो. त्यास ३ ते ४ कांड्या आलेल्या असतात. अशा उसास तुरा येण्यासाठी अनुकूल हवामान मिळाले तर त्याला त्याच वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये तुरा येऊ शकतो.  

• पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो म्हणून या गावाच्या अक्षांशाप्रमाणे जास्तीत जास्त मोठा दिवस येण्याच्या वेळेला २५% वाढीव नत्राची मात्रा देवून पुढे पंधरा दिवसांनी थोडा पाण्याचा ताण दिला तर तुरा(Agricultural Information) येण्याचे प्रमाण कमी राहते. साखरेचा उतारा वाढतो. पावसाळी किंवा मिरगी डोस देण्याची काही ठिकाणी पद्धत या दृष्टीने महत्त्वाची आहे.

उसाला तुरा येण्यामुळे होणारे नुकसान –

ऊसाला तुरा आल्यानंतर उसाची वाढ पूर्णपणे थांबते आणि पक्वता वाढत जाते. तथापि तुरा आल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यात उसाची तोडणी झाली नाही, तर काही जातीमध्ये उसाला पांगशा फुटणे, दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होणे अशा प्रकारचे नुकसान होते.

वाचा: मोठी बातमी! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

उपाय योजना –

• तुरा असलेल्या उसाची तोडणी लवकर करावी.
• उसाची लागवड शिफारस केलेल्या हंगामात व वेळेवर करावी. ऑक्टोबर सप्टेंबर उगवण अथवा फुटवा अवस्थेत असेल तर त्यावर्षी ऑक्टोबर – डिसेंबरच्या काळात तुला येत नाही.
• पावसाळ्यात उसाच्या शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. तुरा येण्याच्या काळात थोडा पाण्यावर तान दिला तर तुरा(Agricultural Information) येण्याचे टळते.
• पॅराक्वाट या रसायनाची गर्भांकुराच्या काळात दोन वेळेस फवारणी केल्यास तुरा येत नाही.

Web Title: Finally understand! Causes and Remedial Plans for Sugarcane Decay; Know the detailed news…

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button