ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

मोठी बातमी; रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाणे उपलब्ध, लाभ घेण्यासाठी कृषी विभागाने केले आवाहन..

Big news; Subsidized seeds available for rabi season, Department of Agriculture appeals for benefits.

रब्बी हंगामासाठी हरभरा, रब्बी , ज्वारी व गहू बियाणे शेतकऱ्यांना (farmers) अनुदानावर उपलब आहेत. या बियाणांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाने (agriculture department) आवाहन केले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (National Food Security Campaign) आणि ग्रामबीजोत्पादन या कार्यक्रमांतर्गत बियाणे उपलब्ध करून दिले आहेत.

वाचा

जिल्ह्यात हरभरा एक हजार ३१८ क्विंटल, रब्बी ज्वारी ३४० क्विंटल, गहू ८०४ क्विंटल इतके अनुदानित बियाण्याचे तालुकानिहाय वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

अनुदान –

१० वर्षे आतील प्रमाणित बियाणे हरभरा फुले विक्रांत, राजविजय २०२, फुले विक्रमसाठी प्रतिकिलो २५ रुपये अनुदान, रब्बी ज्वारी फुले रेवती, फुले सुचित्रासाठी प्रतिकिलो ३० रुपये अनुदान, तसेच ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा जॅकी ९२१८ साठी प्रतिकिलो २५ रुपये अनुदान, तर गहू फुले समाधान, लोकवन व एच.डी. २१८९ साठी १६ किलो प्रति अनुदान राहील.

वाचा

अनुदानित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर (Mahadbt portal) ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले शेतकरी तसेच ऑफलाइन (offline) पद्धतीने शेतकरी (farmers) निवडण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही सुरू असल्यामुळे अनुदानित बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button