ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Firtilizer | मोठी बातमी! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Firtilizer | शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पादन (production) मिळविण्यासाठी नवनवीन खतांचा वापर करतात. पण मात्र प्रमाणित खतांचा वापर करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आता काही खते हे शेतकऱ्यांनी वापरू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने (Department of Agriculture) दिले आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुम्ही खते ( Firtilizer ) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता कृषी सहसंचालकांनी तब्बल 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने त्याच्यावर बंदी घातली आह.

ही खते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे आवाहन देखील आवाहन कृषी विभागाकडून (Agriculture Department) करण्यात आले आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते. यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत (Fertilizer) विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन देखील आता कृषी विभागाच्या (Agricultural Information)वतीने करण्यात आले आहे.

वाचा: एकाच छताखाली मिळणार बियाणे, खते आणि माती परिक्षणाची सुविधा; शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ही खते खरेदी करू नये

शेतकऱ्यांनी जिंकेटेड एस एस पी, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक (Science Chemicals Nashik), एस एस पी के पी आर, ऍग्रो केम (Agro Chem), यासह विविध 19 खतांचे नमुने अप्रमणित आढळून आल्याने ही बंदी घालण्यात आल्याची माहिती (Agricultural Information)देण्यात आली आहे.

खताची किंमत होणार कमी: खताची विक्री होणार ‘ भारत ‘ या नव्या ब्रॅण्डने ! जाणून घ्या कसा होणार शेतकऱ्यांना याचा फायदा?

वाचा: ब्रेकिंग न्यूज: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता होणार खरीप पिक विम्याचे वाटप; तर 14 जिल्हे ठरलेत या साठी पात्र

का वापरू नये ही खते

खतांमधील इनग्रेड (Ingred) कमी झाल्याने ते अप्रमाणिक करण्याचे आदेश कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या रासायनिक खतांची खरेदी करू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान, या खतांवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांनी देखील (Agricultural Information)आता सतर्क होणे गरजेचे आहे. अप्रमणित झालेल्या खतांचा काळाबाजार रोखण्याचे देखील आव्हान आता कृषी विभागासमोर निर्माण झाले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Oh dear! At present, sale of 19 fertilizers is banned in the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button