Yojana | केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक (Financial) प्रोत्साहन मिळावे. शेतकऱ्यांना शेतीसाठी ‘एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक’ या योजनेंतर्गत सर्व योजना राबवल्या जातात. याच अंतर्गत शेती (Agriculture) अवजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शेती अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान (Tractor Subsidy) दिले जाते. आता याच योजनेंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 कोटींचा निधी जमा करण्यात आला आहे.
वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘ही’ बँक दुग्धव्यवसायासाठी देतेय विना तारण कर्ज अन् मिळतंय 25 टक्के अनुदान
शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा
राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण (Agri News) योजना सन 2022-23 मध्ये राबविण्याकरता 240 कोटी निधी 15 नोव्हेंबर 2022 रोजी मंजुर करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ज्यातील 56 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलीय. आता सिंधुदुर्गनगरीमधील कृषी यंत्रे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 कोटी 3 लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत 1 कोटी 59 लाख 80 हजार, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण (Department of Agriculture) योजनेअंतर्गत 1 कोटी 44 लाख 92 हजार रुपये, राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत 98 लाख 91 हजार असे एकूण 4 कोटी 3 लाख 63 हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या (Type of Agriculture) खात्यावर जमा करण्यात आला आहे.
“शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी कंपन्यांची, अन्यथा थेट होणार कारवाई;” कृषिमंत्र्यांच्या सूचना
ऑनलाईन करा अर्ज
या योजनेच्या लाभासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ज्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शेकता. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना हे अनुदान (Subsidy) देण्यात येते. ट्रॅक्टर व अवजरांसाठी तुम्ही अर्ज करू शकता.
काय आहे पात्रता आणि अटी?
• एका शेतकऱ्याला फक्त एकाच ट्रॅक्टरचा लाभ घेता येतो.
• शेतकरी अनुसूचित जाती वर्गामधील असणे आवश्यक.
• या योजनेचा फायदा केवळ एकच अवजारासाठी देण्यात येतो.
• म्हणजे राज्य शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान फक्त एकाच औजारासाठी देण्यात येते. उदाहरणार्थ (ट्रॅक्टर अवजारे / यंत्र )
• आधार कार्ड असणे आवश्यक.
• लाभार्थी कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीकडे जर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभार्थी व्यक्ती पात्र मानण्यात येईल.
• मात्र त्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
• जर एखाद्या लाभार्थी व्यक्तीने अवजारासाठी लाभ घेतला असेल परंतु त्याच अवजारासाठी किमान 10 वर्षे तरी अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येतो.
• एखाद्या शेतकऱ्याने या आधी जर एखाद्या कृषी अनुदानाचा लाभ घेतला असल्यास त्याला ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
• अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केली ‘ही’ योजना; व्यवसायासाठी मिळणार तब्बल 25 लाख, त्वरित करा अर्ज
- शेतकऱ्यांसाठी नव ऍप लॉन्च! आता घरबसल्या ‘या’ ऍपद्वारे समजणार पिकावरील कीड आणि रोग
Web Title: Breaking! As many as 4 crores of agricultural mechanization in district have been credited to the accounts of farmers, check immediately