ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Agricultural Land Grant | भूमिहीन शेतमजुरांसाठी आनंदाची बातमी आता शेतजमीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान

Agricultural Land Grant | Good news for landless farm laborers now 100% subsidy for purchase of farm land

Agricultural Land Grant | महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ आता 100 टक्के अनुदानावर दिला जाणार आहे. यामुळे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांना स्वतःची शेतजमीन(Agricultural Land Grant) खरेदी करण्यास मदत होणार आहे.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांना 04 एकर कोरडवाहू जमीन किंवा 02 एकर बागायती जमीन उपलब्ध करुन दिली जाते. यासाठी आतापर्यंत 50 टक्के अनुदान दिले जात होते. मात्र, आता शासनाने हा अनुदान 100 टक्के केल्याने लाभार्थ्यांना कमी खर्चात स्वतःची शेतजमीन खरेदी करता येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांना शासकीय रेडिरेकनरच्या दराप्रमाणे शेतजमीन खरेदी करावी लागेल. ज्या शेतकऱ्यांना शासकीय रेडिरेकनर दराप्रमाणे त्यांचे वैयक्तिक संयुक्त मालकीची शेतजमीन सामाजिक न्याय विभागास विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वतः समाजकल्याण कार्यालयात अर्ज करावा.

वाचा : Compensation For Damages | गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कशी ठरवली जाणार? जाणून घ्या सविस्तर…

या योजनेसाठी पात्र असण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती, दारिद्रय रेषेखालील, भूमिहीन, त्याच गावचा रहिवासी आणि 18 ते 60 वयोगटातील असावा लागेल. गावातील पात्र लाभार्थी उपलब्ध नसतील तर लगतच्या इतर गावातील किंवा तालुकास्तरावरील पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव सर्व विहित कागदपत्रासह स्वतः समाजकल्याण कार्यालयात जमा करावेत. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी समाजकल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी, अकोला येथे संपर्क साधावा.

Web Title : Agricultural Land Grant | Good news for landless farm laborers now 100% subsidy for purchase of farm land

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button