कृषी सल्ला

ब्रेकींग! 1 जानेवारीपासून सर्व सेवा ऑनलाईन देण्याची सक्ती; शेतकऱ्यांच्या जीवनात होणार ‘हे’ मोठे बदल

Online Service | कोणतही काम करायचं म्हटलं की, प्रशासकीय कार्यालयाच्या 100 (Financial) खेट्या कराव्या लागतात. कोणत्याही कामासाठी सामान्यांना आणि शेतकऱ्यांना (Farming) कार्यालयाच्या किती खेट्या घालाव्या लागतात, तरी देखील ते काम होईलचं असं नाही. तसेच वारंवार यामुळे शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) या कामांमध्ये दिरंगाई होत जाते. आता याबाबतच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचं काम सोपं होणार आहे.

1 जानेवारीपासून सर्व सेवा ऑनलाईन
आता नागरिकांना सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात 1 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्याची सक्ती शासकीयविभागाला (Type of Agriculture) करण्यात आली आहे. या सेवा नागरिकांना पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने देण्यात याव्या अशा सूचना देण्यात आल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांची (Agricultural Information) आणि नागरिकांची कामे सहज होणार आहेत. तसेच प्रशासनाकडून कामांसाठी कोणतीही टाळाटाळ केली जाणार नाही. तसेच ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध न करून दिल्यास थेट प्रशासकीय कर्मचाऱ्यांना यासाठी जबाबदार धरले जाईल.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेसाठी तब्बल 104 कोटींचा निधी मंजुर; जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

ऑनलाईन सेवा
जन्म-मृत्यूचा दाखला, नळ, वीजजोडणी, जात
प्रमाणपत्र, विविध प्रकारच्या परवानग्या, मंजुरी याबरोबरच अनेक प्रकारच्या 506 सेवा कालबध्द पद्धतीने नागरिकांना देणे प्रशासनास बंधनकारक असणार आहे. या 506 सेवांपैकी 400 सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येते. तर यातील 106 सेवा ऑफलाइन पद्धतीने नागरिकांना देण्यात येतात. आता सर्वच्या सर्व सेवा नागरिकांना ऑनलाइन स्वरूपात देण्यात याव्या यासंदर्भात निर्णय घेतल्यामुळे सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

वाचाऐकावं ते नवलचं! फक्त एका अननसाची किंमत ‘इतके’ लाख, जाणून घ्या कोणती आहे ही महागडी जात

शेतकऱ्यांच्या जीवनात होणार मोठा बदल
आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या परिणामकारक अंमलबजावणीकरता या कायद्याखाली अधिसूचित केलेल्या सर्व सेवा 1 जानेवारी 2023 पासून 100% ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आहेत. यामुळे थेट शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. ज्याचं कारण म्हणजे आता कोणत्याही कामात दिरंगाई होणारं नाही. सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्याने घरबसल्या शेतकरी आपली कामे घरबसल्या करू शकणार आहेत. ज्यामुळे त्यांचा वेळही वाचणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Compulsory delivery of all services online from January 1 will be a big change in the life of farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button