Fruit Insurance | फळबागांसाठी (Orchard) देण्यात येणाऱ्या अनुदानात देखील सातत्याने वाढ केली जाते. आता राज्य सरकारने (State Government) 8 फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना (Climate based fruit cropping scheme) या 26 जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती कृषी विभागाकडून ((Department of Agriculture) देण्यात आले आहे. आता याबद्दल एक अपडेट समोर आले आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
फळपिकांचा योजनेत आहे सामावेश
संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या 8 पिकांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना फळशेती करताना नैसर्गिक आपत्तींचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुसकानीमुळे शेतकरी फळबागांची लागवड करण्यापासून दूर राहतात. हवामानाच्या धोक्यामुळे शेतकऱ्यांना जर पिक विमा योजना मिळाल्या शेतकर्यांना आर्थिक फटका बसणार नाही. याच उद्देशाने राज्य शासनाकडून या 8 फळशेतीसाठी पुनर्गचित हवामान आधारीत पीक विमा योजना संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासह या विमा संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले केले.
वाचा: PM Kisaan | तुम्हाला पीएम किसानचा 11 वा हप्ता मिळाला का? नसेल तर त्वरित करा ‘अशी’ तक्रार
पिक विमा अर्जासाठी ठरल्या अंतिम तारखा
- पेरु आणि द्राक्ष व लिंबू फळपिक -15 जून
- चिकू फळपिक – 30 जून
- डाळिंब फळपिक – 14 जुलै
फळपिक विमा योजनेसाठी या हप्ता भरण्यासाठीच्या अंतिम तारखा असणार आहेत. शेतकरी या विम्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
वाचा: Kharif Season | ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांदी, खरिप हंगामासाठी मिळणार थेट बांधावर खते-बियाणे
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य राहील अबाधित
आपत्ती व हवामान प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना फळ पिक विमा मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत (नैसर्गिक आपत्ती/ हवामान) मन शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवणे. शेतकऱ्यांना नवीन सुधारित मशागती तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यामध्ये सातत्य राखणे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: