कोरोनामुळे मृत पावलेल्या नातेवाईकांना 50 हजारांची आर्थिक मदत जाहीर, असा घ्या लाभ..
50 thousand financial aid announced to the relatives who died due to corona, take this benefit ..
कोरोनामुळे (corona) मृत पावलेल्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. १२ सप्टेंबर २०२१ रोजी परिपत्रक काढून या बद्दल घोषणा केली होती. परिपत्रक काढल्यानंतर अंमलबजावणी कशी होणार? अर्जाची प्रक्रिया कशी करायची? कोणते रुग्ण यामध्ये पात्र होतील? त्यांच्या नातेवाईकांची ओळख कशी पटवली जाईल? अटीशर्ती काय असतील? याबद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले होते. या परिपूर्ण मार्गदर्शक सूचनांची माहिती देणारे एक महत्वपूर्ण शासन निर्णय २६ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेला आहे.
शासन निर्णय –
1) महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हीड -१९ या आजारामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. ५० हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे.
2) हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोविड १९ मृत्यू प्रकरणे खालीलप्रमाणे निर्धारित करण्यास येतील
RT-PCR/ Molecular tests/RAT या चाचण्यांमधून positive अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे clinical diagnosis कोविड -१९ असे झाले होते. याच व्यक्तीचे प्रकरण कोविड -१९ मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण समजण्यात येईल.
हे ही वाचा –करारावर लागवड करून “या” शेती व्यवसायातून कमवा लाखो रुपये, कसे पहा सविस्तर..
3) कोविड १९ चे प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असताना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोविड १९ चा मृत्यू समजण्यात येईल.
4) ज्या कोविड -१९ च्या प्रकरणात व्यक्ती कोविड -१९ पासून बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात अथवा घरामध्ये झालेला आहे आणि त्या व्यक्तीची मृत्यू प्रकरणी व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात अथवा घरामध्ये झालेला आहे. आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ च्या कलम १० खाली medical certificate of cause of death (MCCD) हे form ४A मध्ये नोंदणी प्राधीकार्याला निर्गमित केले आहे. अशा व्यक्तीचा मृत्यू कोविड-१९ चा मृत्यू समजण्यात येईल.
5) medical certificate and of cause of death (MCCD) मध्ये कोविड १९ मुळे मृत्यू याप्रमाणे नोंद नसली तरीही वरील २.१ ते २.४ मधील अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे रु.५० हजार च्या सानुग्रह सहाय्यासाठी पात्र असतील.
हे ही वाचा – मोठी बातमी, ग्राहकांनो तुमची डिझेल कार कनव्हर्ट करा इलेक्ट्रिकमध्ये; पहा ही सोप्पी पद्धत..
हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने हि कागदपत्रे सादर करणे गरजेचे –
१) अर्जदाराचा स्वतःचा तपशील , आधार क्रमांक किवा आधार नोंदणी क्रमांक
२) अर्जदाराचा स्वतःचा तपशील आधार क्रमांक किवा आधार नोंदणी क्रमांक
३) अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील
४) मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र
५) इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२१११२६१६१२२१०५१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
हे ही वाचा –