मोठी बातमी; “या” ग्राहकांना मिळणार वीज अनुदान, रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होणार..
Big news; "Yaa" customers will get electricity subsidy, the amount will be credited directly to the customer's account.
ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकार (center government) वीज कंपन्यांना अनुदान न देता थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा करेल. गॅसच्या (gas) अनुदान सारखा हा प्रकार आहे. ग्राहकांना मात्र अनुदान तसेच पूर्ण बिले मिळणार असल्याचे सांगितले. साहजिकच सध्याची बिले खूपच वाढून येणार हे निश्चित आहे. वीज विधेयक केंद्र (Electricity Bill Center) सरकारच्या (center government) आगामी हिवाळी अधिवेशनात सादर केले जाईल. यामुळे फक्त गरजवंतांनाच वीज अनुदानाच (Electricity subsidy) फायदा मिळणार आहे.
वाचा –
सर्वच ग्राहकांना 100% दराने वीज घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ग्राहकांच्या प्रकारानुसार त्याच्या खात्यावर अनुदान स्वरुपात राहिलेली रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले आहे. कृषी, उद्योग, वाणिज्य आणि घरगुती अशा सर्वच श्रेणीतील ग्राहकांसाठी हा नवा पॅटर्न (Pattern) लागू राहणार आहे.
बिलिंगसाठी वेगवेगळे टप्पे
1) सध्या वीज बिलाची आकारणी वेगवेगळ्या टप्प्यात होते. ० ते १०० युनिट, १०१ ते ३०० युनिट, ३०१ ते ५०० युनिट व त्यापुढील युनिट नुसार बिले दिली जातात.
2) कृषी, वाणिज्य, उद्योग, घरगुती अशा वेगवेगळ्या ग्राहकांनुसार विजेचे दरही वेगवेगळे आहेत. सार्वजनिक संस्था, पथदिवे अशा अन्य काही वर्गवारीही आहेत.
3) सर्वाधिक प्रति युनिट वीजदर उद्योगांसाठी आहे. महावितरणच्या एकूण महसुलात ही याच क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. तब्बल ७२ टक्के महसूल उद्योग क्षेत्रातून मिळतो.
वाचा –
या सर्व ग्राहकांना अनुदान –
सध्या सर्वच श्रेणीतील ग्राहकांना अनुदानित स्वरुपातील वीज मिळते. विशेषतः घरगुती व कृषी क्षेत्राचे (agricultural sector) अनुदान मोठे आहे. उद्योग क्षेत्राला सर्वाधिक दर लावून मिळणाऱ्या महसुलातून कृषी व घरगुती ग्राहकांना अनुदान स्वरुपात वीज मिळते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
वाचा –