ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Updates | हवामानाबाबत मोठी अपडेट! राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांना रेड अलर्ट, जाणून घ्या सविस्तर

Weather Updates | राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील रखडलेल्या कामांना आता वेग आला आहे. राज्यातील जवळपास आता सर्व भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून हिंगोली, परभणी, नांदेड, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. तसेच, आजही हवामान विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Weather News) पडणार असल्याचा अंदाच व्यक्त केला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची तारीख झाली जाहीर, जाणून घ्या कधी होणार खात्यात जमा?

चार जिल्ह्यांना रेड अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Updates In Maharashtra) पडण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) जारी केला आहे. तसेच, 15 जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्यामुळे यलो अलर्ट जारी केला आहे.

वाचा: टोमॅटोने जुन्नरच्या शेतकरी दाम्पत्याला बनवले करोडपती! कमावले तब्बल 2 कोटी 30 लाख

कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस?

कोकणामध्ये पावसाचा जोर कायम असून सातत्याने जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे तेथील भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, पुणे, सोलापूर, नाशिक आणि नगर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस सुरू आहे. विदर्भामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये ही सातत्याने पावसाच्या सरी सुरूच आहेत.

दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये आणि ओडिसा किनारपट्टीवरील भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पूर्वेकडील ईशान्य भागात ओडिसा राज्यापर्यंत आणि उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरील भागांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये सरकण्याचा अंदाज आहे. त्याचमुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार शेतीची कामे करणे गरजेचे आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big weather update! Red alert for ‘these’ four districts of the state, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button