lang="en-US"> Weather Update | उष्णतेचा कहर! राज्यात तीव्र उष्णतेची लाट, ‘या’ भागांत 'यलो अलर्ट'

Weather Update | उष्णतेचा कहर! राज्यात तीव्र उष्णतेची लाट, ‘या’ भागांत ‘यलो अलर्ट’

Weather Update | राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असतानाच उष्णतेचा कहर वाढत आहे. हवामान बदलामुळे (Weather Update) काही भागात तापमानात चढ-उतार होत असला तरी, सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र तीव्र उष्णतेच्या झळा सहन करत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी उष्णतेचा त्रास होत आहे. दुपारच्या वेळी तापमानात होणारी वाढ रात्रीपर्यंत कायम राहत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी उष्ण रात्रीचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार:
हवामान तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेचा कहर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेचा काळ दोन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंत असू शकतो. निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर या काळात विशेष काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत.

वाचा|Success Story | नादचखुळा! टोमॅटोच्या लागवडीतून कमावले लाखो रुपये, वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

मराठवाड्यात तापमान वाढणार:
भारतीय हवामान विभागाच्या महासंचालकांनी नुकतेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला. या अहवालानुसार मार्च महिना ‘अल निनो’मुळे सरासरीपेक्षा उष्ण ठरला. एप्रिल आणि मे महिन्यांतही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान सरासरीपेक्षा किमान दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उष्णतेचा पावसावर काय परिणाम?
सध्या पॅसिफिक महासागरात सक्रिय असलेला ‘अल निनो’ एप्रिल-मे महिन्यात तुलनेने कमी तीव्रतेकडे झुकणार आहे आणि पुढे ‘ला-निना’ची स्थिती निर्माण होऊ शकते. असे झाल्यास पूर्वमोसमी पावसासाठी आणि मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

उष्णतेपासून बचाव कसा करावा:

हेही वाचा

Exit mobile version