ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather News | हवामान विभागाचा इशारा! पुढील 24 तासांत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता; वाचा सविस्तर

Weather News | Meteorological department warning! Chance of rain at some places in the state in next 24 hours; Read in detail

Weather News | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. (Weather News) हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. विदर्भातही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वाचा : Onion Rate | जाणून घ्या आजचे ताजे कांदा बाजारभाव ; सविस्तर एका क्लिकवर सविस्तर …

वर्ध्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आधीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना पुन्हा ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातवरण कायम राहत असल्याने याचा फटका तूर पिकाला बसतो आहे. अवकाळी पावसात तुरीचा बहार गळाला होता. आता ढगाळ वातवरण आणि त्यात पावसाची शक्यता वर्तविली जात असल्याने पुन्हा शेतीपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अवकाळी पावसामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title : Weather News | Meteorological department warning! Chance of rain at some places in the state in next 24 hours; Read in detail

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button