ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | शेतकऱ्यांनो राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता! चक्रीवादळामुळे पूरस्थितीची भीती; वाचा हवामान अपडेट

Farmers, chances of rain again in the state! Fear of Cyclone Flooding; Find out in which areas?

Weather Update | राज्यात डिसेंबरची सुरुवात पावसाने होत आहे. शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, गार वारे वाहत असल्याने पावसाला अनुकूल वातावरण आहे. हवामान विभागाच्या Weather Update) अंदाजानुसार, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे १३ डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे राज्यातील जवळपास ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे यवतमाळ जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्या खालोखाल बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

वाचा : Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा होण्यास सुरुवात

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
मदत आणि पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यांना या आपत्तीचा फटका बसला असून, ९१ हेक्टरवरील भाजीपाला आणि आंब्यांचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई, वाडा, डहाणू, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील ५४८ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, भात, नागली, वरई, कडधान्य या पिकांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ५३ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हेक्टरमधील फळझाडांचे नुकसान झाले.

चक्रीवादळामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता
चक्रीवादळामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यास घराबाहेर न पडणे, सुरक्षित ठिकाण शोधणे, नदी किनारी राहणारे नागरिक सुरक्षित ठिकाण हलून जाणे, वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे यासारख्या उपाययोजना कराव्यात.

Web Title:Farmers, chances of rain again in the state! Fear of Cyclone Flooding; Find out in which areas?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button