ताज्या बातम्या

Honda CB350 | रॉयल एनफिल्डची उलटी गिनती सुरू! बाजारात ‘या’ जबरदस्त गाडीच्या रेट्रो स्टाईल अन् परफॉर्मेंसने तरुणाईला लावले वेड

Royal Enfield countdown begins! The retro style and performance of this awesome car in the market made the youth crazy

Honda CB350 | देशातील प्रमुख दुचाकी निर्मिती कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने बाजारात एक नवीन रेट्रो-मॉर्डन बाईक उतरवली आहे. या बाईकने 350 सीसी सेगमेंटवर लक्ष केंद्रीत केले आहे. होंडा कंपनीने भारतीय बाजारात आपली नवीन Honda CB 350 बाजारात आणली आहे. या बाईकची किंमत 1,99,900 रुपये ते 2,17,800 रुपये आहे.

रेट्रो स्टाईलने तरुणाईला वेड लावले
नवीन Honda CB350 ला कंपनीने या सेगमेंटनुसार रेट्रो-मॉर्डन लूक दिला आहे. कंपनी मागील सीबी सीरिज मॉडेलच्या अगदी जवळ आहे. या बाईकमध्ये मस्कूलर फ्युअल टँक, स्टाईलिश ऑल-LED लायटिंग सिस्टम, राऊंड शेप एलईडी हँडलँप, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लँप देण्यात आले आहे. या रेट्रो स्टाईलने तरुणाईला वेड लावले आहे.

परफॉर्मेंसमध्ये रॉयल एनफिल्डला टक्कर
Honda CB350
मध्ये कंपनीने 348.36 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 5500 RPM वर 20.8 bhp ची पॉवर जनरेट करते. तर 3000 RPM वर 29.4 चा पीक टॉर्क जेनरेट करते. या बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. परफॉर्मेंसच्या बाबतीतही ही बाईक रॉयल एनफिल्डला टक्कर देऊ शकते.

वाचा : Drip Irrigation | मोठा निर्णय! शेतकऱ्यांना सात नाहीतर तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ; धोरणातील मोठ्या बदलामुळे ‘इतके’ मिळणार अनुदान

रॉयल एनफिल्डला धोका
रेट्रो-मॉर्डन लूक आणि परफॉर्मेंसमुळे Honda CB350 ने तरुणाईला वेड लावले आहे. यामुळे रॉयल एनफिल्डला धोका निर्माण झाला आहे. रॉयल एनफिल्ड 350 सीसी सेगमेंटमध्ये एकमेव आघाडीची कंपनी आहे. परंतु, Honda CB350 मुळे रॉयल एनफिल्डला आता स्पर्धा करावी लागणार आहे.

कंपनीची अपेक्षा पूर्ण करेल का?
Honda CB350 ची किंमत रॉयल एनफिल्डच्या तुलनेत जास्त आहे. परंतु, या बाईकची रेट्रो स्टाईल आणि परफॉर्मेंस यामुळे ग्राहक या बाईकसाठी जास्त किंमत देण्यास तयार होतील, अशी अपेक्षा कंपनीला आहे. या बाईकची विक्री कितपत होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :

Web Title: Royal Enfield countdown begins! The retro style and performance of this awesome car in the market made the youth crazy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button