योजना

Drip Irrigation | मोठा निर्णय! शेतकऱ्यांना सात नाहीतर तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ; धोरणातील मोठ्या बदलामुळे ‘इतके’ मिळणार अनुदान

Big decision of the center! Drip benefit to farmers after three years; A major change in the policy has now been given 'so much' subsidy

Drip Irrigation | केंद्र सरकारने सूक्ष्म सिंचनाच्या अनुदान वाटप धोरणात महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलामुळे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अधिकाधिक अनुदान मिळेल. केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून पंतप्रधान सूक्ष्म सिंचनासाठी (Drip Irrigation) प्रति थेंब अधिक पीक या उपक्रमासाठी अनुदान मिळते. या योजनेतील किचकट बाबी हटवून काही बदल करण्याचा प्रस्ताव राज्याकडून केंद्राला पाठविला गेला होता. त्यानुसार केंद्राने २०२३ मधील नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले आहेत.

शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ
सध्याच्या नियमानुसार सूक्ष्म संचासाठी सात वर्षांत पुन्हा अनुदान घेता येत नाही. आता हा कालावधी तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्याला एकाच क्षेत्रावर पीक पद्धतीत बदल करण्याची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त, अॅटोमेशनलादेखील अनुदानाच्या कक्षेत आणले गेले आहे. ठिबक आधारित स्वयंचलित प्रणालीसाठी (अॅटोमेशन) आता प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्यास केंद्राने मान्यता दिली आहे.

वाचा : Agriculture Irrigation Scheme | खुशखबर! आता ‘कृषी सिंचन योजने’अंतर्गत मिळणार वैयक्तिक शेततळे; अनुदानात 50 टक्के वाढ

यामुळे राज्यातील अॅटोमेशन आधारित उच्च तंत्रज्ञान कृषी व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. या बदलांमुळे सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे खते व पाण्याची बचत होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.

विशिष्ट बदल
तुषार संचधारक शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ मिळेल.
ठिबक आधारित स्वयंचलित प्रणालीसाठी (अॅटोमेशन) आता प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये अनुदान मिळेल.
सूक्ष्म संचासाठी अनुदानाचा कालावधी सात वर्षांवरून तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Web Title: Big decision of the center! Drip benefit to farmers after three years; A major change in the policy has now been given ‘so much’ subsidy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button