कृषी बातम्या

शेतीच्या पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान झाले असल्यास ‘ हे ‘ करा म्हणजे मिळेल शासन मार्फत नुकसान भरपाई…

If the crops are damaged by wild animals, do 'this' and you will get compensation through the government ..

शेतकऱ्यांना शेती करताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट तर कधी पिक विमा कंपन्या यांच्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत तसेच काहीवेळा उभ्या पिकांमध्ये वन्यप्राण्यांचा देखील शेतकऱ्यांना तितकाच त्रास भोगावा लागत. मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही आता वन्यप्राण्यांच्या मुळे जर शेतकऱ्यांचे शेतीमध्ये नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई देखील मिळते. राज्यातील रानडुक्कर, हरिण, रानगवा, रान हत्ती, माकड, अशा प्रकारच्या वन्यप्राण्यांकडून नुकसान झाल्यास शासनामार्फत नुकसान भरपाई दिला जाते त्यासाठी पुढील अटींची पूर्तता व्हावी लागते.

👉 नुकसान भरपाईची घटना झाल्यापासून तीन दिवसाच्या आत मध्ये वनविभागाच्या अधिकार्‍याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी लागते.

👉 सदर नुकसान भरपाई पिकाची शहानिशा कृषी अधिकारी तलाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून केली जाते त्याचा पंचनामा देखील काढला जातो.

👉 ती नुकसान भरपाई सरासरी किंवा प्रति हेक्‍टर वर मिळत नाही तर प्रत्यक्षात पिकाचे किती नुकसान झाले आहे हे पाहून दिली जाते.

👉 किती मिळेल नुकसान भरपाई

📌 जर नुकसान rs.2000 पर्यंत झाले असेल तर किमान पाचशे रुपये मिळू शकतात

📌 जर नुकसान दोन हजार एक ते दहा हजार रुपये पर्यंत झाल्यास 50 टक्के पर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते कमाल मर्यादा सहा हजार रुपये असते

📌 जर पिकाचे नुकसान दहा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये पर्यंत झाल्यास नुकसान भरपाईच्या 30 टक्केपर्यंत रक्कम भरपाई म्हणून दिली जाते.

अशाच प्रकारची माहिती-तंत्रज्ञान बाजार भाव यशोगाथा वाचण्यासाठी आमच्या शेतकरी चॅनल ला भेट द्या.. व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पर्यंतहि माहिती पोहचवा.
https://www.mieshetkari.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button