ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Solar Eclipse 2023 | यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे ‘या’ दिवशी; जाणून घ्या कोणत्या लोकांनी घ्यावी काळजी?

The last solar eclipse of this year is on 'this' day; Know which people should be careful?

Solar Eclipse 2023 | खगोलशास्त्राच्या दृष्टीने सूर्यग्रहण पाहणे हे एक दुर्मिळ आणि अद्भुत अनुभव आहे. यंदा 2023 मध्ये एकूण 4 ग्रहणं आहेत, त्यापैकी 2 सूर्यग्रहणं आणि 2 चंद्रग्रहणं आहेत. 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणारे सूर्यग्रहण हे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल आणि पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिका आणि अंटार्क्टिका येथे दिसणार आहे. भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा लोकांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थितीवर परिणाम होतो. काही ठिकाणी ग्रहणाचा काळ अशुभ समजला जातो. त्यामुळे गरोदर स्त्रियांना या काळात थोडी काळजी घ्यावी लागते.

वाचा : Solar Eclipse | आज सूर्यग्रहणादिवशी चुकुनही करू नका ‘ही’ कामे; अन्यथा घरादाराला भोगावे लागतील दुष्परिणाम, जाणून घ्या वेळ

गरोदर स्त्रियांना सूर्यग्रहणाच्या काळात काळजी घ्यावी
ग्रहणकाळात घरातच राहावे.
ग्रहण पाहू नये.
मन शांत ठेवावे आणि पचायला हलक्या अन्नाचं सेवन करावं.
ग्रहणकाळात झोपू नये आणि पाणी भरपूर प्यावं.
ग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी विशेष चष्मा किंवा गॉगल्सचा वापर करावा. ग्रहणाचा काळ आरोग्यासाठी हानीकारक असू शकतो. त्यामुळे ग्रहणाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
भारतात सूर्यग्रहण दिसणार नसल्याने या ग्रहणाचे नियम भारतात लागू होणार नाहीत. मात्र, गरोदर स्त्रियांसाठी ग्रहण काळात काळजी घेणे नेहमीच चांगले असते.

हेही वाचा :

Web Title: The last solar eclipse of this year is on ‘this’ day; Know which people should be careful?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button