ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Ration Card | मंत्रिमंडळाचे धडाकेबाज निर्णय! गुढीपाडवा-आंबेडकर जयंतीला फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा अन्…

Ration Card | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्रिमंडळाचे सदस्यही उपस्थित होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने आता दिवाळी तसेच गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिवशी आनंदाचा शिधा (Ration Card) देण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदाच्या शिध्यात (Ration Card) पामतेल, चनाडाळ, साखर आणि रवा 100 रुपयांना दिला जातो.

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

  • गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना लाभ मिळणार आहे.
  • अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यात येणार.
  • 5177.38 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली आहे.
  • 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.

उर्ध्वा प्रवरा प्रकल्प देणार गती
यासोबतच अकोले तालुक्यातील उर्ध्वा प्रवरा प्रकल्पाला गती देण्याचा निर्णयही घेण्यात आला. या कामासाठी 5177.38 कोटी खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ मिळणार आहे.

रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय
यापूर्वी सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावरच देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिवशीही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळेल. महाराष्ट्र गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांसाठी पामतेल, चनाडाळ, साखर आणि रवा 100 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The bold decision of the cabinet! On the occasion of Gudipadwa-Ambedkar Jayanthi, Ananda Ration for just Rs. 100 and

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button