कृषी सल्ला

Agricultural Advisory | देशात कडाक्याचा उन्हाळा अन् शेतकऱ्यांच्या पिकाला धोका! त्वरित जाणून घ्या कृषी सल्ला

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान विभागाकडून पुढच्या 5 दिवस हवामान कसे असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस दिनांक 22 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ (Agricultural advisory) व हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील 5 दिवसामध्ये कमाल तापमान 35.6 ते 36.0 अंश सेल्सिअस (Agricultural Advisory) तर किमान तापमान 15.0 ते 15.4 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता 50 ते 54 टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता 30 ते 34 टक्के राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो हवामान (Weather) आधारित कृषी सल्ला जाणून घेऊयात.

शेतमालाची योग्य साठवणूक
परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस इत्यादी पिकाची (Agriculture) काढणी व मळणी करावी. तसेच तयार शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तरच शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित राहू शकतो.

कृषी सल्ला

  • पुढील 5 दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस, तूर आणि इतर रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील पिकाची कापणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावी.
  • उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास फुलोरा अवस्था (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस), दाण्याची दुधाळ अवस्था (पेरणीनंतर 80 ते 85 दिवस), दाण्यात चिकाची अवस्था (पेरणीनंतर 95 ते 100 दिवस) मध्ये असताना ओलीत करावे.
  • हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके
    ओलीत करावे.
  • फळबागा व भाजीपाला पिकास पीक आच्छादन करावे, जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून
  • ठेवण्यास मदत होईल.
  • हंगामी पिके, फळबागा, भाजीपाला पिकामध्ये आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इत्यादी.) • कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे सुरु ठेवावीत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Tittle: Increase in temperature in the country! Farmers, know the advisory of IMD before the crop is destroyed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button