ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

ऑगस्ट महिन्यापासून नव्या स्वरूपात मिळणार सातबारा, खोट्या नोंदणीला बसणार आळा..

Satbara will get a new look from the month of August, curb false registration

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या स्वरूपात सातबारा (7/12) मिळणार असल्याची घोषणा केली आहे, नवीन फॉरमॅट मध्ये असणाऱ्या सातबारामुळे खोट्या नोंदणीला आळा बसणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचप्रमाणे या नवीन स्वरूपाच्या सातबाऱ्यामुळे तलाठ्यांच्या कामात वेळ वाचणार आहे.

एक ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा’ (‘Celebrate Revenue Day’) केला जातो, यादिवशी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. या सेवेमुळे पारदर्शकता, सरलता तसेच बिनचूक सेवा प्रदान करण्यात येईल तसेच ही सर्व सेवा ऑनलाइन (Online) असणार आहे.

आपली वेगवेगळ्या ठिकाणी जमीन असली तरीही एक सातबारा मिळू शकणार आहे याचे स्वरूप डिजिटल (Digital) असल्याकारणाने फेरफार करण्यास वाव मिळणार नाही असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ई पीक पाहणी (E-crop inspection) हे ॲप्लिकेशन तयार केले असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी सांगितली या ॲप्लिकेशनच्याद्वारे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे पिकांची लागवड, विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे.”

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button