![](/wp-content/uploads/2021/08/ऊसावरील-कीड-रोगांचे-नियंत्रण.jpg)
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते, ऊसापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात उदाहरणार्थ साखर, गूळ, इथेनॉल ऊस अनेक व्हिटॅमिनचा स्त्रोत देखील आहे, उसाच्या पिकावर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याध्ये तांबेरा, पोक्का बोईंग आणि पानावरील ठिपके या रोगांचा आणि खोड किडी, कांडी कीड, हुमणी, पांढरा लोकरी मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पायरीला आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. ही कीड वाढत राहिल्यास उसाचे 26 ते 65 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
ऊसावरील खोडकिडा: Sugarcane stalks
उसावर मोठ्या प्रमाणात खोडकिडा हा रोग आढळून येतो हा रोग पडला असता त्यामधील आळी भुरकट रंगाची असून ही आळी खोड पोखरते त्यामुळे उसाचा शेंडा वाळून जातो.
खोडकिडा नियंत्रण: Insect control
क्लोरानट्रानिप्लोर १८.५ एस सी ५ ते ५.५ मिली प्रती लिटर दराने तोडणीच्या ६ महिने अगोदरपर्यंत वापरावे किंवा
क्लोरपायरीफोस २० % इसी. २२.५- ४५ मिली प्रती १५ लिटर दराने फवारावे किंवा
फीप्रोनील ५ % एस सी ४५ ते ६० मिली प्रती १५ लिटर पंप. तोडणीच्या ९ महिने अगोदर उपयोग बंद करावा किंवा
थायमेथोक्झाम ७५ % एसजी २.४-४.८ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या ७ महिने अगोदर वापर बंद करावा.
खवले कीड: Scaly Insects:
उसाच्या कांडीवर ही कीड आढळते याचा रंग फिकट काळा असून पपुंजाक्यात आढळतो,अश्या प्रकारची कीड उसमधील रस शोषून घेत असते त्यामुळे ऊस निस्तेज दिसू लागतो,त्यामुळे साखर देण्याचेप्रमाणही घटते.
खवले कीडवर नियंत्रण: Scale Pest Control: कापणीनंतर पाचट, धसकटे इत्यादी जाळून टाकावे. मॅलेथीऑन ५० ईसी २००० मिलि किंवा डायमिथोएट ३० ईसी २६५० मिलि १००० लिटर पाण्यात मिसळून फवारण्या कराव्यात. ऊस लावतेवेळी बेणे डायमिथोएट ३० ईसी २६५ मिलि किंवा मॅलाथिऑन ५० ईसी २०० मिलि १०० लिटर पाण्यात मिसळून होणा-याद्रावणात बुडवून लावावे.
उसाचे व्यवस्थापना करताना ही घ्या खबरदारी: Take care while managing sugarcane
- शक्यतो हलक्या जमिनीत उसाची लागवड करू नये. उसाची लागण 10 फेब्रुवारीपूर्वीच पट्टा पद्धतीने शिफारस केलेल्या हंगामातच करावी.
- शिफारशीत कीड प्रतिकारक जातींची (उदा. फूले 0265) लागवड करावी.
- हुमणीच्या अळ्या आणि कोष नैसर्गिक शत्रूंना बळी पडण्यासाठी दोन नांगरटी जास्त कराव्यात. शेणखतामधूनच हुमणीच्या अळ्या शेतात जातात. त्यामुळे खताच्या प्रत्येक गाडीत 1 किलो 10 टक्के कार्बारील भुकटी मिसळवी.
- पहिला पाऊस पडल्याबरोबर बाभूळ, बोर व कडूनिंब इ. झाडांवर हुमणीचे भुंगेरे रात्री साडेसात ते साडेनऊ या काळात पाने खाण्यासाठी व मीलनासाठी एकत्र येतात हे भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत.
- बेणे मळ्यातील निरोगी आणि कीडविरहित बेण्याची निवड करावी. किडलेल्या बेण्याचा लागवडीसाठी उपयोग करू नये.
- पिठ्या ढेकूण व खवले कीड नियंत्रणासाठी लागणीपूर्वी बेणे 300 मिलि. मॅलथिऑन किंवा 265 मिलि. डायमिथोएट 100 लिटर पाण्यात सिळून त्यात बेणे 10 ते 15 मिनिटे बुडवावे व नंतर लागवड करावी.
- उसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळ बांधणी केल्यास, खोडकिडीचे पतंग बाहेर पडणारी छिद्रे बंद होण्यास मदत होईल खोडकीडा व कांडीकीड यांच्या नियंत्रणासाठी ऊस लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी 50000 ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीडी प्रति हेक्टर या प्रमाणात साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 4 ते 6 वेळा सोडाव्यात. खोडकीड व कांडीकीड यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 5
कामगंध सापळे (ई.एस.बी/आय.एन.बी.ल्यूर) शेतात लावावेत. - पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते वापरल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. पिठ्या ढेकूण कीड नियंत्रणासाठी प्रादुर्भावित उसाचे खालील वाळलेले पाचट काढावे. अशावेळेस वरील 8-9 हिरवी पाने ठेवावीत.
- डायमीथोएट 30 टक्के प्रवाही 26 मिलि. अथवा डायक्लोरोव्हॉस 76 टक्के प्रवाही 11 मिलि. प्रति 10 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
- पांढरी माशी नियंत्रणासाठी व्हर्टिसिलिअम लिकोनी.
- 1 किलो अधिक 1 लिटर दूध प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. फवारणी अगोदर औषध रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे.रासायनिक नियंत्रणासाठी ऑक्सिडिमेटोन मिथायील 3.2 मिलि किंवा डायमिथोएट 2.6 मिलि
किंवा 2 मिलि मॅलथिऑन किंवा डायक्लोरोव्हास 1 मिलि प्रती लीटर पाण्यात मिसळून फवारावे. - वरील सर्व औषधांबाबत तज्ञांचा सल्ला घ्यावा, तज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास अधिक उपयोग होऊ शकतो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :