ताज्या बातम्या

ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणार्‍यांसाठी आरबीआयचा अलर्ट जारी! वाचा सविस्तर पणे…

RBI issues alert for online money transfers ..! Read in detail.

आपण जर ऑनलाइन बँकिंगची (ONLINE BANKING) सुविधा वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एक ट्विट केले आहे आणि कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट (Alert customers) जारी केला आहे. अरबीआय (RBI) ने अशी सूचना दिली आहे की 23 मे रोजी एन. ई.एफ.टी (NEFT) सर्विस काही तास बंद राहणार आहे. 22 मे चे कामकाज आटोपल्यानंतर या सिस्टिमचे टेक्निकल अपग्रेडेशन (Technical upgradation of the system)चालू होणार आहे. त्यासाठी ग्राहकांनी आपले काम 22 मे रोजी पूर्ण करावे. ग्राहकांना कोणाला NEFT द्वारे पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ते दिनांक 22 मे रोजी ट्रान्सफर करण्याचे नियोजन करावे.

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम (National Electronic Funds Transfer System) शी संपूर्ण देशात चालणारे एक ऑनलाइन पेमेंट (Online payment) सेवा आहे. या सिस्टीम द्वारे आपण कोणत्याही बँकेतून दुसऱ्या बँकेला पैसे पाठवू शकतो. एनईएफटी द्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची किमान मर्यादा नाही, म्हणून तुम्ही किती रक्कम ट्रान्सफर करू शकता. ही रक्कम प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळी असू शकते.

भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

एन ई एफ टी व्यतिरिक्त ग्राहकांना RTGS आणि IMPS (immediate payment system) या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. कोणताही ऑनलाइन व्यवहार ( online transaction ) करताना या सुविधांचा लाभ आपण घेऊ शकतो. परंतु या दोन्ही सिस्टिमला आरबीआयने (RBI) काही मर्यादा घातलेल्या आहेत. या दोन्ही सिस्टीम द्वारे पैसे ट्रान्सफर करताना आपण कमाल दोन लाखापर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे आरबीआयने ग्राहकांना अलर्ट मेसेज दिला आहे, 23 मे रोजी एन ई एफ टी ही सुविधा सकाळी बारा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत काम करणार नाही. 22 मे चे कामकाज आटोपल्यानंतर या सिस्टिमचे टेक्निकल अपग्रेडेशन (technical upgradation) चालू होणार आहे.

केंद्र सरकारकडून मोठा निर्णय! तूर, मूग, उडीद आयात केल्यावर पहा काय परिणाम होईल किंमतीवर..!

हे ही वाचा:

मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना गिफ्ट! किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण व त्याची देय मुदत “या” तारखेपर्यंत वाढ…

बघा, “पिक कर्ज” मिळण्याची संपूर्ण प्रोसेस फक्त एका क्लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button