lang="en-US"> Meftal Spas Tablet | मेफ्टाल स्पास गोळीचे सेवन करताना सावधानता बाळगा; जाणून घ्या का ते सविस्तर ...

Meftal Spas Tablet | मेफ्टाल स्पास गोळीचे सेवन करताना सावधानता बाळगा; जाणून घ्या का ते सविस्तर …

Meftal Spas Tablet | Be careful while consuming Meftal Spas Tablet; Know in detail...

Meftal Spas Tablet | मासिक पाळीच्या वेळी पोटदुखीवर इलाज किंवा साधारण अंगदुखीवर इलाज म्हणून अनेक जण मेफ्टल स्पास (Meftal SPAS) घेतात. मात्र, केंद्र सरकारने या गोळीबाबत इशारा दिला आहे. या गोळीमध्ये आढळणारे मेफेनेमिक ॲसिड (Mefenamic Acid) गंभीर एलर्जिक रिएक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतं.

मेफेनेमिक ॲसिड (Mefenamic Acid) चा वापर करून मेफ्ताल स्पास तयार करण्यात येते. संधिवात (Gout/ Gouty Arthritis), ऑस्टियोआर्थरायटिस (Osteoarthritis) यासारखे हाडांचे रोग, तसेच मुलींमध्ये मासिक पाळीत वेदना, सामान्य वेदना, सूज, ताप आणि दातदुखी यावर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.

फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (PVPI) डेटाबेसमधून मेफ्ताल स्पास गोळीच्या दुष्परिणामांच्या प्राथमिक विश्लेषणातून ड्रेस (DRESS) सिंड्रोम झाल्याचं समोर आलं आहे. ड्रेस (DRESS) सिंड्रोम (Syndrome) ही काही औषधांमुळे होणारी गंभीर एलर्जी आहे. यामुळे शरीरावर रिॲक्शन होते, ज्यामुळा त्वचेवर लाल रंगाचे चट्टे किंवा व्रण उठतात, ताप येतो किंवा लिम्फ नोड्स (Lymph Nodes) या ग्रंथींना सूज येते. हे एलर्जी रिॲक्शन गोळ्यांचे सेव केल्यानंतर दोन ते आठ आठवड्यांमध्ये दिसू शकते.

वाचा : Dress Syndrome | वाचा! डोकेदुखी, मासिक पाळीच्या वेदनांसाठी घेत असलेल्या या औषधामुळे होऊ शकतो गंभीर आजार!

या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने मेफ्टाल स्पास गोळीचे सेवन करताना खालील काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे:

ड्रेस (DRESS) सिंड्रोमच्या लक्षणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अलर्टमध्ये काय म्हटलं?

Web Title : Meftal Spas Tablet | Be careful while consuming Meftal Spas Tablet; Know in detail…

हेही वाचा

Exit mobile version