जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…
How to do government survey of land; Learn the whole process ...
जमिनीच्या पोटहिस्यांवरून आणि जमिनीची बरोबर मोजणी नसेल तर अनेक वाद निर्माण झालेले आपण पाहतो. जमिनीची विभागणी करताना किंवा आपणाला कधीही आपल्या जमिनीची मोजणी करायची असेल तर ती शासकीय पद्धतीने कशी करावी हे जाणून घेऊ. जमिनीची शासकीय मोजणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया भूमी अभिलेख विवभागाकडे आहे. या विभागामार्फत जमिनीची शासकीय मोजणी केली जाते. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भूमी अभिलेख विभाग स्थापन केलेला असतो.
जमिनीची मोजणी करताना तालुका विभागीय भूमी अभिलेख कार्यालयास एक अर्ज करावा लागतो हा अर्ज तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाइन ही करू शकता. ऑफलाइन अर्ज कारण तुम्हाला तुमच्या
- जमिनीचा तपशील ,
- जमिनीच्या चतू :सीमा ( जमिनीच्या ४ ही बाजू च्या दिशा ),
- अर्जदाराचे नाव, मोजणीचे कारण देणे अत्यंत आवश्यक आहे
- जमीन मोजणी करताना फी भरल्याचे बँक
इत्यादी गोष्टीची माहिती तुम्हाला अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
जमिनीची मोजणी करण्याच्या अर्जासोबत तुम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागतात त्यामध्ये
👉 तुमच्या जमिनीचा सातबारा
👉 मोजणीचा प्रकार ( तातडीची मोजणी, अति तातडीची मोजणी, अति अति तातडीची मोजणी)
👉 वादाचा तपशील- ( जर कोणी तुमच्या जमेनीवर कब्जा केला असेल तर त्याचे नाव )
👉जमिनीचा नकाशा मोजणीचे कारण जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज सादर करायचा असेल तर ,महाभूमीअभीलेख विभागाच्या वेबसाइट वर जाऊनही तुम्ही अर्ज करू शकता. अर्जामध्ये वर दिलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/
अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया काय आहे
अर्ज केल्यानंतर तुम्हाला मोजणी रजिस्टर क्रमांक मिळतो त्यानंतर तुमच्या जमिनीचे पूर्वीचे रेकॉर्ड काढून तुम्हाला भूकर मापक दिला जाईल. हा भूकर मापक तुमच्या शेताच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, जमिनीशी संलग्न लोकांना १५ दिवस आधी नोटीस पाठवतो. यामध्ये ज्या तारखेला मोजणी करायची आहे त्या तारखेला उपस्थित राहण्यासंबधी नोटीस असते.
भूकर मापक , इतर ५ संलग्न लोक यांच्या समोर तुमच्या जमिनीची मोजणी केली जाते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या सीमा ठरवून दिल्या जातात. भूकर मापक आधीचे रेकॉर्ड पाहून प्रामाणिकपणे जमिनीची नोंदणी करून देतात.
ई मोजणी आज्ञावली मुळे खातेदारांना झालेला फायदा
🔶 खातेदार अधिकार अभिलेख (7/12) व लगत खातेदारांच्या माहितीसह कार्यालयात उपस्थित राहिल्यास त्याचा मोजणीचा अर्ज संगणकामध्ये नोंदवुन घेतला जातो व त्याला रु.3000/- च्या वरील रक्कमेचे मोजणी फी चे चलन किंवा रु.3000/- च्या आतील रक्कमेची पावती पैसे भरल्यास तात्काळ दिली जाते.
🔶अधिकार अभिलेख (7/12) , मोजणी फी चे चलन अथवा पावती व मोजणीचा अर्ज या तीन कागदपत्रांच्या आधारे मोजणीची कार्यवाही पारदर्शकपणे केली जात आहे.
🔶 कोषागारात मोजणी फी चे पैसे भरुन मोजणीचा अर्ज कार्यालयांत जमा केल्यास तात्काळ मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते ज्यामध्ये मोजणीचा दिनांक,मोजणीस येणारा कर्मचारी,त्याचा मोबाईल क्रमांक,कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती असते.वरील संपुर्ण प्रक्रीयेसाठी खातेदारास हेलपाटे मारावे लागत नाहीत. योग्य व अचुक मोजणी फी खातेदाराकडुन घेतली जाते.
🔶 प्रस्तुत प्रकरणाचे संगणकीय आज्ञावलीतुन नियंत्रण होत असल्याने ठराविक कालावधीत प्रकरण निकाली करण्याचे न कळत बंधन आल्याने खातेदारास तत्पर सेवा मिळत आहे.घर बसल्याही खातेदाराला आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती समजुन घेता येत आहे.
🔶 योग्य माहिती नमुद केल्यास खातेदारास आपल्या प्रकरणांत होणारी संभाव्य मोजणी फी सुध्दा आज्ञावलीतुन घरबसल्या समजते.
🔶 एकंदरीत खातेदाराला त्याच्या मोजणी प्रकरणाबाबत कार्यालयांत केली जाणारी संपुर्ण कार्यवाही पारदर्शकपणे व वेळेत केली जाणार असल्याची खात्री मिळत आहे.
भविष्यातील वाटचाल:-
- राज्यातील नगर भूमापन अधिकारी कार्यालयामध्ये सुध्दा दिनांक 01/01/2013 पासुन ई मेाजणी आज्ञावली सुरू होत आहे.त्या आधारे नागरी विभागातील नागरिकांना तत्पर सेवा उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.
- मोजणी फी ची रक्कम कोषागारात भरणा करण्यासाठी खातेदारांना कोषागारात बराच वेळ रांगेत उभे रहावे लागत आहे.त्यामुळे
- प्रस्तुत प्रकरणाचे संगणकीय आज्ञावलीतुन नियंत्रण होत असल्याने ठराविक कालावधीत प्रकरण निकाली करण्याचे न कळत बंधन आल्याने खातेदारास तत्पर सेवा मिळत आहे.घर बसल्याही खातेदाराला आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती समजुन घेता येत आहे.
- योग्य माहिती नमुद केल्यास खातेदारास आपल्या प्रकरणांत होणारी संभाव्य मोजणी फी सुध्दा आज्ञावलीतुन घरबसल्या समजते.
- एकंदरीत खातेदाराला त्याच्या मोजणी प्रकरणाबाबत कार्यालयांत केली जाणारी संपुर्ण कार्यवाही पारदर्शकपणे व वेळेत केली जाणार असल्याची खात्री मिळत आहे.खातेदारांना मानसिक त्रासास सामोर जावे लागते ही खातेदारांची अडचण दुर करण्यासाठी ई मोजणी आज्ञावली वित्त विभागाच्या ग्रास (Government Receipt Accounting System) आज्ञावलीशी संलग्न केली जाणार आहे त्यामुळे खातेदारांना कोषागारा ऐवजी तालुक्यातील निवडक राष्ट्रीयकृत बॅकांच्या शाखांमध्ये पैसे भरुन घेण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच जे खातेदार Internet Banking चा वापर करतात अशा खातेदारांना Internet Banking च्या माध्यमातुन मोजणी फी घरबसल्या भरता येणार आहे.ग्रास आज्ञावलीमार्फत भरल्याजाणाऱ्या मोजणी फी चे Reconciliation परस्पर केले जाणार आहे.
- या पुढील काळात खातेदारांना Internet च्या माध्यमातुन मोजणी चा अर्ज घरातुन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत वाटचाल सुरू आहे. ई मोजणी आज्ञावलीच्या माध्यमातुन एक पारदर्शक लोकाभिमुख कार्यालयीन कामकाज करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..