कृषी सल्ला

वांगी या फळपिकाच्या या जातीची लागवड करा आणि मिळवा भरघोस उत्पादन…

वांगी फळपिकाच्या जाती

मांजरी गोटा : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने लहान ते मध्‍यम आकाराची असतात. खोड पाने आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पटटे असतात. फळांचा आकार मध्‍यमहिन्‍यात ते गोल असतो. या जातीची फळे चविला रूचकर असून काढणीनंतर 4 ते 5 दिवस टिकतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 300 ते 400 क्विंटल.

वैशाली : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने खोड आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे आणि फूले झुबक्‍यांनी येतात. फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्‍यावर पांढरे सरमिसळ पटटे असतात. फळे मध्‍यम आकाराची अंडाकृती असतात. सरासरी हेक्‍टरी उत्‍पादन 300 क्विंटल.

प्रगती : या जातीचे झाड उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्‍या रंगाची असतात. पाने फळे आणि फांदयावर काटे असतात. या जातीचे फूले आणि फळे झुबक्‍यांनी येतात. फळे अंडाकृती आकाराची असून फळांच्‍या रंग आकर्षक जांभळा असून पांढ-या रंगाचे पटटे असतात. पिकांच्‍या कालावधी 175 दिवस असून 12 ते 15 तोडे मिळतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल.

अरूणा : या जातीची झाडे मध्‍यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्‍यात लागतात. फळे मध्‍यम आकाराची आणि अंडाकृती असून त्‍यांचा रंग चमकदार जांभळा असतो. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 300 ते 350 क्विंटल वांग्‍याच्‍या वरील जाती शिवाय कृष्‍णा एम एच बी 10 या अधिक उत्‍पादन देणा-या संकरीत जाती आहेत.

रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवडयांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्‍यास उत्‍पादनात घट येते. तसेच जुन फळे गि-हाईकांच्‍या पसंतीस उतरत नाहीत. 4 ते 5 दिवसांच्‍या अंतराने 10 ते 12 वेळा वांग्‍याची तोडणी करता येते. वांग्‍याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते.

वांगी पिकाचे सरासरी हेक्‍टरी उत्‍पादन जाती परत्‍वे 100 ते 250 क्विंटल पर्यंत येते.

WEB TITLE: Cultivate this variety of eggplant and get a good yield …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button