ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

इ-पिक पाहणीच्या माध्यमातून अँपवरती घरबसल्या आपल्या पिकांची नोंद कशी कराल? वाचा सविस्तर…

How do you record your crops at home through e-crop survey? Read more

पिकांची नोंद शेतकर्यासाठी अतिशय महत्वाची आहे.पिक कर्ज किंवा पिक विमा काढायचं असेल तसेच बांधावरील झाडांच्या नोंदी असतील.या गोष्टींसाठी नोंदी करणे शेतकर्यासाठी गरजेचं आहे. पिकाच्या नोंदणी आधारावर पिक कर्ज व पिक विमा दिला जातो. अतिवृष्टी किवा नुकसानभरपाई सुद्धा पिकाच्या नोंदीच्या आधारे दिली जाते. आपण पाहिलंय कि पिकाच्या नोंदीसाठी तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागते आणि तलाठी प्रत्यक्ष प्रत्येक शेतामध्ये जावू शकत नसल्याने जे शेतकरी सांगतील त्या पिकांची नोंद त्याठिकाणी त्यांना ७/१२ वरती करावी लागते. यामुळे बर्याच पिकाच्या नोंदी सुद्धा चुकीच्या होऊ शकतात याचा परिणाम म्हणजे शासनापर्यंत लागवडीचा डेटा चुकीचा पोहचतो. शेतकऱ्याच्या नोंदी अचूक व्हाव्या.

शासनाला पिकांच्या फळांच्या तसेच बांधावरच्या झाडांची लागवड हा डाटा अचूक मिळावा. नुकसानभरपाई सुद्धा अचूक मिळावी यासर्वांची याठिकाणी सांगड घालण्यासाठी हे अँप्लिकेशन अतिशय महत्वाच ठरणार आहे. यापूर्वी हे अँप्लिकेशन सुरुवातीला ७ जील्यांमधील १० तालुक्यासाठी सुरु करण्यात आलेले होते. सुरुवातीला कमी प्रमाणात नोंदी झाल्या होत्या. परंतु आता हे अँप्लिकेशन पूर्ण राज्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे,याचे तलाठी लॉग इन देण्यात आलेले आहेत आणि याठिकाणी शेतकर्याच्या माध्यामातून जे काही नोंदी करण्यात आलेले आहेत त्यात शेतात घेतलेले फोटो असतील ते फोटो व्हेरिफाई करून तलाठ्याच्या माध्यमातून अप्रूव केले जातात.

पिकांच्या नोंदी कशा कराव्या ?

  • इ-पिक पाहणी प्ले स्टोअर वर सर्च करून डाउनलोड करा.
  • यानंतर ओपन करून त्याठिकाणी मोबाईल नबर मागितला जाईल.चालू असलेला मोबाईल नबर प्रविष्ट करा.
  • पुढे गाव,जिल्हा,तालुका निवडा.
  • त्यानंतर गट नंबर येईल गट नंबर टाकून किंवा खाते क्रमांकाने आपल्या गावातील आपलं नाव सहजरित्या शोधू शकतो.
  • यानंतर मोबाईल नबर वर ओटीपी येईल तो टाकून आपण लॉग इन ची शेवटची पायरी पूर्ण होईल.
  • लॉग इन झाल्यावरती प्रोफाईल माहिती भरून तिथे असलेल्या पैकी पिकाची माहिती या ऑप्शनवर क्लिक करा .
  • यानंतर जर तुमचे वेगवेगळे खाते व गट नबर असतील तर तिथे ऑप्शन येईल. एकच असेल तर एकच दाखवला जाईल. तिथून पुढे जावू शकता.
  • याठिकाणी कोणत्या प्रकारचे पिक निवडायचे खरीब, हंगामी यामध्ये पिकानुसार एक निवडा.
  • पिक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दाखवतात जे पूर्ण आपल्या खात्यावरती आहे.
  • यानंतर पिकाचा प्रकार निर्भळ,मिश्र ,पॉलीहाउस, शेडनेटहाउस पिक यामधून ऐका पिकाची निवड करा.
  • त्यानंतर पिक आणि फळबाग यापैकी एक निवडा
  • पिकांची फळांची कडधान्याची नावे निवडा.
  • क्षेत्र भरा (हे- आर)
  • सिंचनाचा प्रकार दिलेले असतील त्यापैकी एक निवडा .
  • विहीर असेल तर विहीर निवडू शकता.
  • सिंचनाची पद्धत.
  • लागवडीची दिनांक टाका.
  • कॅमेराचा अकॅसेस ओके करून आपल्या पिकाचा फोटो काढून उपलोड करा आणि सबमिट वर क्लीक करा.
  • आणि शेवटी आपली माहिती भरली आहे. नोंद झाली आहे. असं नोटिफिकेशन येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button