ताज्या बातम्या

Gold Silver Price| विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

Gold silver price| आपला सगळ्यात लाडका धातू म्हणजे सोनं (Gold). सोन्यापासून बनवलेले दाग दागिने, कलाकुसरीच्या वस्तू, देवी देवतांच्या मूर्ती सर्वांनाच हव्याहव्याशा वाटतात. सर्वसामान्य माणसं सगळ्यात जास्त गुंतवणूक सोन्यात करत असतात. गुढीपाडवा असो की दसरा, सुवर्ण खरेदी ही केली जाते. भले, दर कितीही असो! आजच मिळालेल्या माहितीनुसार सोन्या-चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. फ्युचर्स आणि स्पॉट मार्केट या दोन्ही मार्केटमध्ये सोन्याची आतापर्यंतच्या सर्वात महाग दरात विक्री होत आहे. जगभरातील बाजारात अतिशय गोंधळाचं वातावरण आहे. त्यामुळे सोन्याचा भाव वाढला आहे.

वाचालूट थांबणार? दूध संकलन केंद्रांना लगाम, राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

का महागलं सोनं

जगभरातील व्यवहार डॉलरमध्ये (Dollar) चालतात. मात्र काही आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे डॉलर कमकुवत होत आहे. डॉलर सध्या दोन महिन्याच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. अमेरिकेत बेरोजगारीचा (Unemployment) दरही वाढलेला आहे. यामुळे सोन्याचे दर महागले आहेत. सोन्याची किंमत उच्चांकावर पोहोचली आहे. 2 हजार 40 प्रति औंस डॉलर इतकी सोन्याची किंमत आहे. चांदीसुद्धा (Silver) यात मागं नाही. चांदीनं 25 प्रति औंस डॉलरचा आकडा पार केला आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत सोन्या- चांदीचे भाव वाढले आहेत.

असे आहेत दर

22 कॅरेट सोन्यासाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 56 हजार 250 रुपये तर 24 कॅरेट साठी दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे 61 हजार 360 रुपये. 10 ग्रॅम चांदीचा दर आहे 770 रुपये इतका.

देशभरातील सोन्याचे दर

मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबादमध्ये 61,360 रुपये, चेन्नईमध्ये 62070 रुपये तर लखनऊ आणि दिल्लीमध्ये 61,510 रुपये इतका सोन्याचा दर आहे.

खरेदी करताना घ्या काळजी

सोनं खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे. त्यावरील हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डनं (BIS) दिलेली शुद्धतेची हमी असते. यामुळे सोनं खरेदी करताना हॉलमार्क पाहणं गरजेचं आहे. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असं लिहिलेलं असतं. तेव्हा सोनं खरेदी करताना हे नक्की बघून घ्या.

वाचा: हर्षोल्हास! कापूस वधारला, शेतकरी आनंदला दरात झाली ‘इतकी’ वाढ शेतकरी संघटनेची ‘ही’ नाराजी

कॅरेट मधील फरक

अतिशय शुद्ध सोनं हे 24 कॅरेटचं असतं जे 99.9% इतकं शुद्ध असतं. मात्र यापासून दागिने बनवण्यात येत नाहीत. दागिने बनवण्यात येतात ते 22 कॅरेट सोन्यापासून. हे सोनं साधारणतः 91 टक्के शुद्ध असतं. यामध्ये तांबे, चांदी, जस्त यांसारख्या धातूंचं 9 टक्के इतकं मिश्रण असतं.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button