Heavy Rain | पावसाचा हाहाकार! फक्त 4 चारात 100 मिमिहून अधिक पाऊस; डोळ्यासमोर लोकांचे संसार गेले वाहून
Heavy Rain | नागपूरमध्ये काल रात्री ढगफुटी झाली. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. या तलावाचे पाणी नागपूरच्या मध्यवर्ती भागात म्हणजे सीताबर्डी परिसरात भरलं आहे. एखादी नदी वाहावी इतक्या प्रचंड प्रमाणात तलावाचं पाणी सीताबर्डी परिसरात वाहत आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये हे पाणी शिरलं आहे. घराघरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
मोरभवन बस स्टॉपला तर नदीचं स्वरूप आलं आहे. बस स्टॉपमध्ये चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचलं आहे. या पुराच्या पाण्यात 8 ते 10 एसटी अडकल्या आहेत. बस पाण्यात अडकल्याने वाहक आणि चालकांनी एसटीच्या टपावर जाऊन आश्रय घेतला. रात्रभर हे वाहक आणि चालक एसटीच्या टपावर होते. सात ते आठ जण एसटीच्या टपावर अडकून पडले आहेत.
त्यांना बाहेर काढण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढलं जात आहे. याच बस स्टॉपच्या बाहेर पुलाखालीही प्रचंड पाणी भरलं आहे. त्यामुळे पुलाखाली अनेक कार अडकून पडल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. नागपूरमध्ये इतर भागातही हीच परिस्थिती ओढवली आहे.
जिल्हाधिकारी स्पॉटवर
शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान मदत कार्य करत आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
4 तासात 100 मिमी
अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली.नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Disadvantages of Eating Salt | जास्त मीठ खाणे तुमच्या शरीरासाठी ठरू शकते घातक! जाणून घ्या काय आहेत जास्त मीठ खाण्याचे तोटे?
- Chickenpox New Variant | भारतात चिकनपॉक्सचा नवा व्हेरीयंट! बचावासाठी त्वरित जाणून घ्या ‘ही’ 9 लक्षणे
Web Title: The rain! More than 100 mm of rain in only 4 seasons; People’s lives are gone before their eyes