Fertilizer Subsidy | राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना खतावर मिळणारं 100 टक्के अनुदान
Fertilizer Subsidy | महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना फळबागांसाठी आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खत (Fertilizer Subsidy) खरेदीसाठी होणारी आर्थिक भार कमी होणार आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत सन 2023-24 पासून या योजनेअंतर्गत आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर या 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
खतांसाठी 100 टक्के अनुदान
तसेच फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागांमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येईल. खतांसाठी होणारी आर्थिक भार कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Chickenpox | बाप रे! नवीन चिकनपॉक्सचा प्रकार पसरतोय वेगाने, लहान मुलांना आहे अधिक धोका, ‘असा’ करावा बचाव
- Abha Health Card | आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय? ते कसे बनवावे? ज्यावर मिळणार तुमच्या आरोग्याची सर्व माहिती एका क्लिकवर
Web Title: Big decision of the state government! Now farmers get 100 percent subsidy on fertilizer