ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

शेतीसाठी उपयुक्त असलेले हे भन्नाट अवजार पाहिले का? कोळपणी, नांगरटीसह होतात जलद गतीने ही कामे..

सांगलीमधील एका शेतकऱ्याने (farmers) शेतीच्या (agriculture) अंतर्गत मशागतीसाठी जुगाड चारचाकी तयार केली आहे. ईश्वरपुरमधील कुमार पाटील यांनी हे अवजार बनवण्यासाठी 1 वर्ष मेहनत घेतली. दुचाकी इंजिनाचा वापर करून चारचाकी बनवली या गाडीला 60 हजार रुपये खर्च करण्यात आला असला तरी आता शेतीमधील कोळपण्याचे काम अगदी उत्तम करत आहे. या चारचाकी अवजाराने 1 लिटर पेट्रोलमद्धे 1 एकर शेती कोळपुन झाली आहे.

वाचा –

दुचाकीचे 100 सीसी इंजिन वापरून हे अवजार बनविले –

कुमार यांचा फॅब्रिकेशन चा व्यवसाय आहे. यांनी आतापर्यंत छोटी छोटी सायकल, कोळपी तसेच इतर लोखंडी अवजारे बनविली आहेत. हे करत असताना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अवजार बनवता येईल का विचार केला व दुचाकीचे 100 सीसी इंजिन वापरली व 4 चाकी बनविली. या गाडीला शेतीची अवजारे कसे जोडता येतील याचा अभ्यास करून जोडण्यात आली. ही गाडी कोळपणी, नांगरट, पेरणी तसेच औषध फवारणी या कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरली आहेत. कमी जागेत सहज गाडी नेता येते आणि शेतीतील कामे करता येतात.

या चारचाकीने 1 लिटर पेट्रोल मध्ये 1 एकर शेतीचे कमी वेळात कोळपणी केली आहे. 1 वर्षाची मेहनत फळाला लागली असल्याची सांगितले आहे. 60 हजार खर्चाने कितीतरी शेतकऱ्यांसाठी हे अवजार उपयुक्त ठरलेल आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button