ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Breaking News | सत्तासंघर्षाचा निकाल लागला; उद्धव ठाकरेंना ही चूक महागात पडली तर राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे !

Breaking News | बहुचर्चित महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष फक्त शिंदे व ठाकरे गटाच्या ( Shinde & Thackeray Sarkar) सत्ता संघर्षाच्या निकालाकडे लागले होते. अशातच आज हा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले

शिंदे व ठाकरे गटाकडून एकूण चार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. या चार याचिकांवर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची चुकीची भूमिका, उद्धव ठाकरे यांचा राजीनामा व भरत गोगावले यांचा व्हीपचा निर्णय या मुद्द्यावरून चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

वाचा: ‘या’ नंबर वरून कॉल येतायत तर सावधान ! होऊ शकते मोठी फसवणूक ; वेळीच घ्या ‘ही’ काळजी

सुप्रीम कोर्टाचा निकाल

सुप्रीम कोर्टाने १६ आमदार अपत्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narveka) यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच त्यांनी लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा. असेही यामध्ये सांगितले आहे. भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर असून राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.

तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते.

सुप्रीम कोर्टाच्या निकालात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या भूमिकेवरून निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी स्वतःहून राजीनामा दिला नसता तर आज कोर्टाने सरकार परत आणलं असतं. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गट अडचणीत आला आहे. असे सांगण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार प्रमुख याचिका कोणत्या ?

१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी १६ आमदारांच्या निलंबनाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.
२) ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली होती.
३) ठाकरे गटातल्या १४ आमदारांच्या निलंबना संदर्भात सुद्धा याचिका सादर झाली होती.
४) ३-४ जुलैचे विशेष अधिवेशन अवैध ठरवण्याची मागणी सुभाष देसाई यांनी केली होती.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Supreme court announced result on sattasanghrsh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button