शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘ही’ बँक दुग्धव्यवसायासाठी देतेय विना तारण कर्ज अन् मिळतंय 25 टक्के अनुदान
Subsidy | भारतातील शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच पशुपालन हेही आर्थिक (Financial) उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. ग्रामीण भागात लाखो लोक आहेत, ज्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन पशुपालन (Animal Husbandry) आहे. तर दुग्धव्यवसायातून दूध, दही, तूप विकून अनेकजण लाखोंची कमाई करत आहेत. अशा लोकांसाठी आज आम्ही एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत.
वाहतुकीसाठी कर्ज
बँक इमारत बांधकाम, दूध संकलन प्रणाली, स्वयंचलित दूध मशीन आणि दुग्धव्यवसाय चालविण्यासाठी वाहतूक यासाठी कर्ज (Bank Loan) देत आहे. या कर्जाचा व्याज दर (Cheap Interest Loan Rates) 10.85% पासून सुरू होतो, जो कमाल 24% पर्यंत पोहोचू शकतो.
“शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी कंपन्यांची, अन्यथा थेट होणार कारवाई;” कृषिमंत्र्यांच्या सूचना
2 लाखांच मिळेल कर्ज
स्वयंचलित दूध संकलन प्रणाली मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही एक लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. त्याच वेळी, बँक तुम्हाला इमारत बांधकामासाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Loan) देऊ शकते. तसेच वाहतुकीच्या नावाखाली वाहन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपयांचे कर्ज घेता येईल. विशेष म्हणजे कर्ज देण्यासाठी बँक शेतकऱ्यांची कोणतीही मालमत्ता गहाण ठेवत नाही.
25 टक्के मिळतंय अनुदान
त्याचबरोबर दुग्धउद्योजकता विकास योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय (Dairy Business) सुरू करण्यासाठी 25 टक्के अनुदानही देत आहे. तुम्ही आरक्षित कोट्यातून असाल तर तुम्हाला 33% सबसिडी मिळेल. यासाठी तुम्हाला 10 जनावरांपासून हा व्यवसाय सुरू करावा लागेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- सरकारी पेन्शनर्सना नो टेन्शन; हयात असल्याचा पुरावा आता द्या घरी बसून…
- चर्चा तर होणारचं ना राव! चक्क 1 कोटींच्या बंगल्यात राहते ‘ही’ गाय अन् खाते तुपातले लाडू, जाणून घ्या खासियत
Web Title: Good news for farmers!bank provides unsecured loans for dairy farming and gets 25 percent subsidy