ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Gram Panchayat Fund | गावाच्या विकासासाठी मिळालेला 100 टक्के निधी खरंच वापरण्यात येतो का? ‘या’ ऍपद्वारे मिळवा माहिती

प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि गावाचे प्रत्येक कामकाज पाहण्यासाठी ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.

Gram Panchayat Fund | “पंचायती राज हा भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.” असे पंचायती राज दिनानिमित्त ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. ते गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र, या निधीचा पुरेपूर फायदा हा गावाच्या (Village) विकासासाठी किंवा गावाचे बजेट भागविण्यासाठी केला जातो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात गावच्या विकासासाठी मिळालेला निधी हा कितपत वापरला जातो, ग्रामपंचायत किती खर्च करते.

केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळतो ‘इतका’ निधी
ग्रामविकास समितीची बैठक ही दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यांमध्ये घेतली जाते. त्याचवेळी गावाचा विकास, शिक्षण, महिला कल्याण यासंदर्भात चर्चा केली जाते व या संबंधित लागणारा निधी हा शासनाकडून किती किती अपेक्षित आहे याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येते. त्याचबरोबर समजा एखादी योजना ही राज्य शासनाद्वारे मिळत असेल तर त्यासाठी राज्य शासन जवळपास 100 टक्के निधी देतं. बरोबर केंद्रात शासनाच्या योजनांसाठी केंद्र शासनाद्वारे 60 टक्के निधी देण्यात येतो. तर त्यातील उर्वरित उर्वरित निधी हा 40 टक्के राज्य शासनाद्वारे देण्यात येतो.

वाचा: Agriculture | महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्री करणं झालं कठीण, आता ‘या’ नियमांना तोंड दिल्याशिवाय पर्याय नाही, जाणून घ्या नवे नियम

15 वा वित्त आयोग लागू

खर तर, 15 व्या वित्त आयोगाला 1 एप्रिल 2020 पासून सुरुवात झाली आहे. 5 वित्त आयोगानुसार प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाला दरवर्षी शासनाकडून 957 रुपये देण्यात येतात. याउलट ज्यावेळी 14 वित्त आयोग होता त्यावेळी गावातील प्रत्येक व्यक्तीला दरवर्षी 488 रुपये शासनाद्वारे मिळत होते. 15 व्या वित्त आयोगानुसार प्रत्येक गावाला पाणीपुरवठा व स्वच्छता यासाठी मिळालेल्या निधीतून 50 टक्के निधी वापरण्यास सांगण्यात आला आहे. त्याचबरोबर उरलेला 50 टक्के निधी हा गावातील विविध विकासासाठी वापरण्यात यावा असे सांगण्यात येते.

वाचा: Loan Waiver | कर्जमाफी न केल्याने नाही, तर कर्जमाफीमुळेच शेतकरी होतात कर्जबाजारी? वाचा नोबार्डचा कारणांसहीत अहवाल

गावाला मिळणारा निधी कसा खर्च केला जातो ते कसे पाहाल?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी ‘ई-ग्राम स्वराज’ हे हे मोबाईल ऍप सुरू केले. या ऍपद्वारे नागरिक गावातील विकास कामांची पूर्ण माहिती पाहू शकतात. यासाठी नागरिकांनी ‘ई-ग्राम स्वराज्य’ ऍप डाऊनलोड करून मिळालेला निधी कुठे आणि कसा खर्च केला जातो हे पाहता येईल. त्याचबरोबर ॲप डाऊनलोड केल्यानंतर एक पेज ओपन होईल. त्यानंतर आपले राज्य गाव या संदर्भात माहिती भरावी लागेल. तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती मिळेल. अनेकदा गावासाठी मिळालेला शंभर टक्के निधी हा वापरला जात नाही. त्यातील जवळपास 30, 40 50 लाखांपर्यंतचा निधी हा वापरण्यात येत नाही. मग या उर्वरित निधीच काय केले जाते हा प्रश्न उपस्थित होतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button