ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Agriculture | आता शेतीतील कामे करण्यासाठी यंत्रमानव, शेतकऱ्यांची ‘ही’ कामे होणार सहज

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे (Cutting edge technology) आपले जीवन अतिशय सुधारले आहे.

Agriculture | मानव हा नवीनवीन गोष्टींचा शोध लावत आहे. या उपलब्ध मशीन्स (Machines) आणि गॅझेट्सच्या (Gazettes) सहाय्याने मानव आपली सर्व कामे सहजरीत्या व कमी वेळात पूर्ण करत आहे. आपले संपूर्ण जीवन हे यंत्राद्वारे (Instrument) व्यापले गेले आहे. असाच मानवाने विकसित (Human evolved) केलेला एक यंत्र म्हणजे रोबोट (Robot) होय.

शेतीसाठी केला जातोय रोबोटचा वापर
जागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच युरोपमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतीमधील कामांसाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी शेतीची कामे करण्यासाठी रोबोंचा वापर सुरू केला आहे. हे रोबो शेतीमधील सर्व कामे कमीत कमी वेळात सहजरीत्या करत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे.

वाचाYojana | शेतकऱ्यांनो सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळतय 50% अनुदान

रोबोट काय करतो काम?
शेतीमध्ये काम करणारे हे रोबो पेरणी, नांगरणी, खुरपणी, रोपलावणी, पिकांना पाणी देणे आणि पेरलेले बीज तपासणे इत्यादी कामे सहजरीत्या करत आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्या या रोबोच्या व्हेरीयंटला ‘ड्राईड’ असे म्हणतात. हा रोबो जीपीएस सिग्नलद्वारे बियाणांची तपासणी करून रेकॉर्ड ठेवत असतात. तसेच, हे रोबो सौऊर्जेवर काम करणारे आहेत.

वाचाCrop Insurance | शेतकऱ्यांच्या खात्यावर 200 कोटींचा पीक विमा जमा, जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

दरम्यान, रोबोमुळे विकासाचा वेग दुप्पट झाला आहे. हे रोबो प्रत्येक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहे. तसेच, या रोबोमध्ये कालांतराने बदल करण्यात येत असून त्यातीलच शेतीच्या विविध कामासाठी वापरण्यात येणारा एक प्रकार म्हणजे ड्राईड होय. तसेच, रोबो कधी आजारी पडत नाही. कधी सुट्टी मागत नाही. त्यामुळे भविष्यात रोबोचा वापर हा पूर्ण जगभरातील शेतीमध्ये केला जाऊ वेळेची बचत होऊन सर्व कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button