ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

आनंदाची बातमी ! येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार ; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

अवकाळी पावसामुळे ( Unseasonal Rain) राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून सतत नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. काल (ता.१६) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CMO Eknath Shinde) यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

येत्या दहा दिवसांत नुकसान भरपाई मिळणार

राज्यात सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना येत्या दहा दिवसांत देण्यात यावी. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (ता.१६) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. या बैठकीमध्ये पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil) यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला. यावर ग्रामीण भागातील इतर मंत्र्यांनीसुद्धा शेतकऱ्यांना तातडीने ही मदत मिळाली पाहिजे असा आग्रह धरला.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

मुख्यमंत्र्यांची पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत चर्चा

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत चर्चा केली. यावेळी सचिवांनी पुढील दहा दिवसांत मदत दिली जाईल, असे सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी मुदत व पुनर्वसन विभागाने येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले.

सरसकट भरपाई दिली जाणार नाही

राज्यातील विविध भागांतून राज्य सरकारकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव आले आहेत. यामध्ये नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे महसूल विभागातून राज्य सरकारकडे तब्बल तीन हजार १२८ कोटी ९६ लाख रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. मात्र तरीही सरसकट ही भरपाई दिली जाणार नाही. विविध निकषाच्या अधारे ही भरपाई निश्चित केली जाणार आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

नुकसान भरपाई देण्यासाठी शास्त्रीय निकष गृहीत धरणार

याआधी राज्यसरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७५५ कोटी ६९ लाख रुपये इतका निधी वितरित केला आहे. परंतु, सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या प्रस्तावाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी राज्य सरकारने नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीने नुकसानीचे काही शास्त्रीय निकष गृहीत धरले आहेत. यानुसार शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी होणार आहे. यानुसार आलेल्या प्रस्तावांची या निकषाद्वारे पडताळणी करूनच नुकसानीची रक्कम निश्चित केली जाणार आहे.

Farmers will get compensation within ten days

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button