ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

El Nino Effects | महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती, ४३ तालुक्यांमध्ये “ही” प्रक्रिया चालू , जाणून घ्या कोणती ते सविस्तर ..

El Nino Effects | Drought situation in Maharashtra, "This" procedure is applicable in 43 talukas, know which one in detail..

El Nino Effects | अल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-टू’ लागू करण्यात आला आहे.

राज्यात मागच्या ४ महिन्यात सरासरीच्या ४० टक्केसुद्धा पाऊस झाला नसल्याने खरिप हंगाम बऱ्यापैकी मोठ्या नुकसानीला सामोरे जात आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात अत्यंत वाईट परिस्थिती असलेल्या राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-टू’ लागू करण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी पाच तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात तालुक्यांचा समावेश आहे.

पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस, पावसाचा खूप दिवसांचा खंड, जमिनीतील पाणीपातळीत घट, पिकपेरा व अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट, संपूर्ण पिके वाया जाणे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणीपुरवठा होणाऱ्या स्रोताची सद्य:स्थिती अशा सर्व बाबींचा विचार करून काही तालुक्यांमध्ये दुष्काळासंदर्भातील ट्रिगर-टू’ लागू करण्यात आला आहे.

खरीप २०२३ हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन महा-मदत’ प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे. ट्रिगर-टू लागू झालेल्या तालुक्यांमधील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य संवेदन उपाययोजन केंद्र, नागपूर यांच्यावतीने तयार केलेल्या ‘महा-मदत’ अॅपचा वापर करावा लागणार आहे.

वाचा : Crop Damage Compensation | आनंदाची बातमी! अतिवृष्टीचा तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

किती मदत मिळनार

दुष्काळाचा अहवाल तयार झाल्यानंतर दुष्काळाची अंतिम कार्यवाही होऊन बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर होणार आहे. ही प्रक्रिया अद्याप सुरू होत असून त्याचा अहवाल ऑक्टोबरअखेरीस शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून मदत जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जिरायतदार शेतकऱ्यांना ८ हजार ५०० तर बागायतदार शेतकऱ्यांना १७ हजार, बहुवार्षिक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना २२ हजार ५०० रुपये मदत मिळू शकते.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन त्यांना आर्थिक मदत केली जाणे आवश्यक आहे. तसेच, पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठीही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

Web Title : El Nino Effects | Drought situation in Maharashtra, “This” procedure is applicable in 43 talukas, know which one in detail..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button