कडुलिंबाच्या कंगव्याबद्दल माहीत आहे का? केस गळतीचा प्रश्न कायम संपवतो व केसांना देतो अधिक चमक..
केस गळती (hair fall) या समस्यांना अनेक जणांना सामोरे जावे लागते. केस गळती (hair fall) थांबवण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा वापर करतात. ज्यामध्ये केमिकल प्रॉडक्ट्सचा अधिक वापर करण्यात आलेला असतो. आयुर्वेदिक वापरांकडे कोणी लक्ष देत नाही. केस गळतीसाठी (hair fall) कंगवा सुद्धा परिणाम करतात. हे आपल्या लक्षात येत नाही. केस तुटण्याला अनेकदा तकंगवाही जबाबदार असतो. जर तुम्ही मोठ्या दातांचा तेही कडुलिंबाचा कंगवा वापरला तर केसांची गळती 90% कमी होईल ती कशी? याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
कडुनिंबाच्या कंगव्याचे फायदे –
कडुलिंबाचा कंगवा (Neem Comb Benefits) मधून अनेक फायदे मिळतील. लाकडी कंगवा वापरल्यास केसांमध्ये कमी घर्षण होते, ज्यामुळे केस कमी तुटतात. तसेच केस देखील कमी तेलकट राहतात. कडुनिंबाच्या लाकडापासून बनवलेला कंगवा बॅक्टेरियाविरोधी (Bacteria) आणि सेप्टिकविरोधी (septic) आहे. त्यामुळे डोक्यातील कोंडा आणि टाळूच्या संसर्गापासून आराम मिळतो.
कडुलिंबाच्या कंगव्याने रक्ताभिसरण सुधारते –
रक्ताभिसरण प्रक्रिया (Circulatory process) सुधारण्यास मदत होते आणि टाळू निरोगी बनतो. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते. केसांना पोषण मिळते कडुलिंबाच्या लाकडाचा (neem) कंगवा वापरल्याने केस कमी तुटतात. यासोबतच केसांना पोषणही मिळते. या कंगव्याने केस विंचरतो तेव्हा टाळूवर असलेले नैसर्गिक तेल (Natural oil) केसांमध्ये समान रीतीने व्यवस्थित पसरते. यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात.
वाचा –
मोठ्या दातांचा कंगवा ठरेल अधिक प्रभावी –
केस गळणे (hair fall) थांबते मोठ्या लाकडी दाताचा कंगवा वापरल्याने केसांचे तुटणेही मोठ्या प्रमाणात कमी होते. खरं तर, जेव्हा केस एकमेकात गुंतलेले किंवा ओले असतात, जेव्हा तुम्ही लहान दातांच्या कंगव्याने केसांना विंचरता तेव्हा केसांमध्ये अधिक घर्षण होते, ज्यामुळे केस अधिक तुटतात. तर रुंद आणि मोठ्या दातांचा कंघवा केसांना चांगले डिटॅंगल करते आणि केस तुटण्याची समस्याही पूर्णपणे दूर करते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा