कृषी सल्लाफळ शेती

“या” फळाची बाजारात दमदार एंट्री; खरेदीसाठी ग्राहकांची होतेय प्रचंड गर्दी, पहा या फळाचे काय आहेत दर..

मार्केटमध्ये “सिमरन” या फळ (Fruit) खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. ही गर्दी मुंबई एपीएमसी या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. ग्राहकांना ‘सिमरन’ फळाचे (Simran fruit) खास आकर्षण असल्याने फळ खरेदीसाठी फळ (Fruit) बाजारात गर्दी पहायला मिळत आहे.

वाचा –

सिमरन फळ –

पावसाळी आंबे संपल्यावर फळ (Fruit) बाजारात “सिमरन” फळाचा हंगाम सुरु होतो. या फळाचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो. हे फळ (Fruit) दिसायला साधारणतः टोमॅटो फळासारखे असून ग्राहकांचे मात्र खास आकर्षण ठरले आहे. सिमरन फळ (Simran fruit) चवीला गोड असल्याने खरेदीसाठी खवय्यांची चांगलीच गर्दी फळ बाजारात पाहायला मिळत आहे. हे फळ सुरवातीला हिरवळ आणि पिवळसर असते. पिकल्यावर ते लाल रंगाचे होत असून ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. तर हे फळ शिमला येथून येत असल्याने त्याला ‘सिमरन’ (Simran) म्हणून ओळखले जाते.

वाचा-

या फळात जवळपास अनेक जीवनसत्व (Vitamin) आहेत. त्यामुळे कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी या फळाला (fruit) लोक पसंती देत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. काही मोजक्या व्यापाऱ्यांकडे या फळाची आवक येत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते.

या फळाचा भाव –

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून हे फळ येत असून मुंबई एपीएमसी बाजारात साधारण 1 ते 2 हजार बॉक्सची आवक होत आहे. या फळाचा एक बॉक्स अंदाजे बारा ते चौदा किलोचा असतो. घाऊक बाजारात त्याच्या एका पेटीला दर्जानुसार 1200 ते 1800 रुपये भाव मिळत आहे. आपल्याला हे फळ चाखायचे असल्यास आपण देखील एपीएमसी मार्केटमध्ये खरेदी करता येईल.

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button