ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

हळद लागवड ठरतेय अधिक प्रभावी; लागवड अधिक उत्पन्न काढायचे आहे? तर रोगांचे नियंत्रण असे करा…

हळदीला अधिक मागणी असते. त्यामुळे हळद लागवड शेतकऱ्यांना परवडू शकते. हळद जातींची माहिती घेऊन योग्य लागवड केली तर पाहिजे तेवढे उत्पन्न घेऊ शकता. हळद लागवडीबद्दल सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

हळद लागवड करताना अशी काळजी घ्या –

हळद लागवडीसाठी (turmeric cultivation) उष्ण व कोरडे हवामान लागते. हळद लागवडीसाठी काळी जमीन किंवा पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. नदीकाठच्या जमिनीत हळदीचे (turmeric) उत्पन्‍न भरपूर मिळते तसेच हळदीच्या (turmeric) लागवडीसाठी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हळद या पिकास सेंद्रिय खताचा (organic manure) पुरवठा केल्यास भरपूर उत्पादन (income) मिळते. त्यासाठी 50 ते 80 गाड्या चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत टाकून चांगले मिसळा. याशिवाय वरखते हेक्टरी 13 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश द्या. मात्र नत्र हे तीन समान हप्त्यांत द्या. पहिला हप्ता 6 व्या आठवड्यात उगवण पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरा हळदीचे पीक 2.5 ते 3 महिन्यांचे झाल्यानंतर खोदणी करायच्या वेळी द्या. हळद (turmeric) हे पीक (crop) जमिनीत वाढणारे आहे म्हणून जमीन स्वच्छ ठेवा. जमिन जास्त तुडवली जाऊ नये याचीही काळजी घ्या.

वाचा –

रोगांपासून करा असे नियंत्रण –

लागवडीआधी बियाणास ऍगलाल किंवा पारायुक्‍त औषध 1 लिटर पाण्यात 4 ग्रॅम व बी. एच.सी. 50 टक्के पाण्यात मिसळा. या द्रावणाची प्रक्रिया 10 मिनिटे लावणीपूर्व करावी. तसेच करपा या प्रकारच्या रोगात लांबगोल तपकिरी ठिपके दिसतात व ठिपक्यात वर्तुळे दिसतात. यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करा.

हळद काढणीनंतर –

काढणीनंतर हळकुंड 8-10 दिवस ढीग करून ठेवावीत. त्यामुळे हळकुंडात चिकटलेली माती (Soil) पडते. हळदीला काहील चुलवणीवर ठेवून शिजवतात. काहिलीमध्ये हळद (turmeric) शिजवताना हळदीच्या वर 4-6 बोटे पाणी राहील असे ठेवावे. तळातील व वरच्या हळदीचा थर चांगला वाफारून निघतो. हळद शिजवण्यास 2.5 ते 3 तास लागतात. शिजलेली हळद घट्ट जमिनीवर अथवा फरशीवर पसरावी. हळद 7 ते 8 दिवस वाळवावी.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button