कृषी बातम्या
ट्रेंडिंग

कसा होईल वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ? कारण कि विहीर मिळवणे झाले सुखकर पंचायत समिती ला मिळाले अधिकार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक पातळीवर मजुरांना अकुशल स्वरूपाचे काम उपलब्ध करून देतानाच त्यासोबत सामूहिक व वैयक्तिक स्वरूपाची उत्पादन मत्ता निर्माण करायांची आहे. या अनुषंगानेच स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन सुविधा म्हणून विहिरीचा लाभ योजनेअंतर्गत देण्यात येतो. या विहिरीचा लाभ देण्यासाठी लाभधारकांची निवड ग्रामसभेमार्फत केली जाते.

त्यानंतर संबंधित लाभधारकाचा सविस्तर प्रस्ताव तयार करून गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या कार्यालयात सादर करण्यात येतो. त्यानंतर हा प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकार जिल्हा परिषद यांच्यामार्फत सादर करण्यात येतो. ही प्रकिया खुप लांबलचक व मनुष्य बळ नसल्याने या योजेपासून खुप लोक वंचित होते.

आता मात्र योजने मध्ये बदल करण्यात आले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा परिषद यांना प्रदान करण्यात आले होते. पुन्हा सह कार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील मजुरांसोबतच शेतकऱ्यांनादेखील लाभ होणार आहे.

WEB TITLE: How to benefit from individual irrigation wells? Because getting the well was the right of the Sukhkar Panchayat Samiti; See detailed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button