ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Bank Recruitment | शेतकऱ्यांच्या पोरांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ पदावर तब्बल 2,100 जागांसाठी भरती; आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू

Bank Recruitment | A golden opportunity for farmers' sons! Recruitment for as many as 2,100 posts in 'Ya' post; Application process starts from today

Bank Recruitment | बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेने (Bank Recruitment) ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर ग्रेड ओ आणि एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी 2,100 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यामधील 800 जागा ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर आणि 1,300 जागा सेल्स आणि ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी आहेत. अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया आजपासून (22 नोव्हेंबर) सुरू झाली आहे. अर्जाची शेवटची तारीख 6 डिसेंबर आहे.

कधी होणार परीक्षा?
एक्झिक्युटिव्ह पदासाठी 30 डिसेंबर रोजी परीक्षा होईल. तर, ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 31 डिसेंबर रोजी परीक्षा होईल. या तारखांमध्ये बदल झाल्यास आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर त्याबाबत माहिती देण्यात येईल.

पात्रता
ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी (कमीत कमी 60 टक्के गुण) असणे आवश्यक आहे. SC/ST/PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 2 नोव्हेंबर 1998 ते 1 नोव्हेंबर 2003 या कालावधीतच झालेला असावा. या पदासाठी 6.14 लाख ते 6.50 लाख रुपये (सीटीसी) एवढा वार्षिक पगार मिळेल.
एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएट असावी. या पदासाठी पहिल्या वर्षी 29,000 रुपये प्रति महिना; तर दुसऱ्या वर्षी 31,000 रुपये प्रति महिना एवढा पगार मिळेल.

वाचा :

  • अर्ज कसा करावा?
  • IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येईल. अर्ज भरताना उमेदवाराने खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • स्वाक्षरी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र
  • निवास प्रमाणपत्र

अर्जाची फी
सामान्य उमेदवारांसाठी अर्ज फी 1,000 रुपये आहे. SC/ST/PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी शुल्क नाही.

निवड प्रक्रिया
या भरती प्रक्रियेत उमेदवारांची पात्रता, लेखी परीक्षा आणि मुलाखत या आधारे निवड केली जाईल.

IDBI बँकेबद्दल
IDBI बँक
ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ही बँक 1964 मध्ये स्थापन झाली होती. IDBI बँक विविध प्रकारच्या वित्तीय सेवा प्रदान करते, ज्यात कर्ज, बचत खाते, चालू खाते, गुंतवणूक उत्पादने इत्यादींचा समावेश होतो. या भरतीमुळे बँकेच्या विस्तारासाठी मदत होईल आणि उमेदवारांना करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

हेही वाचा :

Web Title: Bank Recruitment | A golden opportunity for farmers’ sons! Recruitment for as many as 2,100 posts in ‘Ya’ post; Application process starts from today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button