SBI Recruitment: ‘या’ सरकारी बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! 42 हजार रुपये पर्यंत मिळणार वेतन वाचा सविस्तर बातमी…
SBI Recruitment: A golden opportunity to work in 'Yaa' Government Bank! Salary up to Rs 42,000 Read detailed news
एसबीआय स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) आणि मॅनेजर पदासाठी पात्र असणारे उमेदवार स्टेट बँकेच्या www.sbi.co.in/careers या वेबसाईटवर बेट देऊन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची तारीख 28 जून निश्चित करण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीप्रक्रियेनुसार CRPD/ SCO-FIRE /2020-21 आणि CRPD/SCO 2021-22/06 नुसार इंजिनिअर (फायर ) आणि मॅनेजर पदासाठी भरती होणार आहे. इंजिनिअर फायर आणि मॅनेजर पदाच्या एकूण 16 जागांवर भरती होणार आहे
हेही वाचा : पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख पटकन जाणून घ्या; पॅनकार्ड आणि आधार कार्ड कसे जोडाल…
इंजिनिअर (Engineer) फायर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार भारत सरकार आणि यूजीसीच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई (फायर) आणि बीटेक (सेफ्टी अँड फायर इंजिनिरिंग ), बी.टेक . (फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजिनिअरिंग) किंवा बीएस्सी फायर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. नॅशनल फायर सर्व्हिसेस (National Fire Services) नागपूर येथून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मॅनेजर पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर ,एबीए किंवा पीजीडीएम पूर्ण केलेले असावे. एनबीएफसीमध्ये काम केल्याचा किमान 7 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
हेही वाचा : कापसावरील, गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून मुक्तता मिळवण्यासाठी करा “या उपायोजना…
स्टेट बँक उमदेवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जांची पडताळणी, शैक्षणिक गुणवत्ता, अनुभवाच्या आधारे योग्य उमेदवारांना मुलाखतीला बोलवेल. मुलाखत 100 गुणांची असेल. बँकेकडून योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमदेवारांना 23 हजारांपासून ते 42 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.
हेही वाचा :
FACT CHEACK: काय सांगता! कोंबड्यांपासून म्युकोरमायकोसिसचा प्रसार होतो? सत्यता पडताळा फॅक्ट चेक…
सल्ला तज्ञांचा: जाणून घ्या, जनावरांच्या आहारामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असावा…