इतर

RBI | बँक कर्मचाऱ्यांना लंचसाठी निश्चित तास नाहीत, ताटकळत ठेवल्यास ग्राहक ‘अशा’प्रकारे नोंदवू शकतात तक्रार

कोणतीही बँक किंवा बँकेतील कर्मचारी 'लंच ब्रेकच्या' नावाखाली ग्राहकांना थांबून घेऊ शकत नाहीत, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

RBI | आरबीआयच्या (RBI) डिपार्टमेंट ऑफ बँकिंग रेगुलेशन नुसार बँक (Bank Transaction) कर्मचाऱ्यांना लंच ब्रेकसाठी कोणतेही निश्चित तास नाहीत. बँकेतील (Bank) कर्मचारी एकाच वेळी सगळे जेवणाची सुट्टी घेऊ शकत नाहीत. प्रत्येकाने बँकेचे आर्थिक (Financial) व्यवहार चालू ठेवूनच जेवणाची सुट्टी सोयीनुसार घेऊ शकतात.

वाचा: Planting Vegetables | शेतकऱ्यांनो ‘या’ महागड्या भाजीपाल्याची लागवड करून दर महिन्याला कमवा बक्कळ नफा

ग्राहक नोंदवू शकतात तक्रार
ग्राहकांना लंच ब्रेकच्या नावाखाली ताटकळत ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. एखादा कर्मचारी लंच ब्रेकच्या नावाखाली जर तुमचे काम करत नसेल किंवा ताटकळवून ठेवत असेल तर तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवू शकता.

वाचा: Tur | केंद्र सरकारचा तूर उत्पादकांना मोठा फटका! देशात तूर आणि उडीद आयातीसाठी केला पुढील ‘इतक्या’ वर्षांसाठी करार

तक्रार कशी करायची?
बँकेत तक्रार पुस्तिकेत तक्रार नोंदवू शकता. त्याची दखल कोणी घेत नसल्यास व्यवस्थापक, नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवता येते. शिवाय प्रत्येक बँक तक्रार निवारण मंच असतात या मंचाच्या फोन नंबर किंवा ई-मेलवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. बँकेच्या तक्रार मंचाचा नंबर कस्टमर केअर ( customer care) कडून मिळवता येतो. जर एका महिन्यात बँकेने तक्रारीची दखल न घेतल्यास बँकिंग लेखपालाकडे अपिलात जाता येते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Bank employees do not have fixed hours for lunch, customers can file a complaint

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button