!["या" जिल्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पीक विमा देण्यासाठी दिल्या सूचना; इतर ठिकाणीही लवकरच दिला जाणार पीक विमा..](/wp-content/uploads/2021/09/Copy-of-A-New-Design-Made-with-PosterMyWall-89_11zon.jpg)
राज्याच्या विविध भागामध्ये 2021 पूर परिस्थिती अतिवृष्टी तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेला पावसाचा खंड या कारणांमुळे शेतकर्यांचे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान (loss) झाले होते. नुकसान झालेल्या शेतकर्यांसाठी पिक विमा (Crop insurance) राबवताना काही तरतुदी करण्यात असून उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, पुणे, सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकार्याच्या माध्यमातून आधी सूचना निर्गमित करून पिक विम्याचे २५ टक्के आगावू स्वरुपात वाटप करण्याचे सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.
या ठिकाणी 25 टक्के आगाऊ स्वरूपात वाटप सूचना देण्यात आल्या –
शेतकर्यांचे अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमध्ये किंवा पावसाचा खंड यामुळे नुकसान झाले तर जिल्हा समितीच्या माध्यमातून त्या भागाचे सर्वेक्षण (Survey) केले जाईल, सर्वेक्षणामधून उत्पादनामध्ये होणारे घट जर ५० टक्के पेक्षा जास्त अपेक्षित असेल तर अशा शेतकर्यांना पिक विम्यासाठी पात्र ठरवून त्यांना २५ टक्के पर्यंतचा पिक विमा अग्रिम स्वरुपात दिला जाईल असा नियम होता. या नियमानुसार उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, पुणे, सांगली या जिल्ह्यात 25 टक्के आगाऊ स्वरूपात रक्कम देण्याच्या सूचना दिलेल्या आहे.
वाचा: कमी मेहनतीत व कमी खर्चात वर्षाला काढा 25 लाख उत्पन्न; पहा कोणती आहे “ही” शेती..
नांदेड जिल्ह्यामध्ये उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट, पीक विमा देण्यासाठी अधिसूचना –
या पाश्वर्भूमीवर नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांचे देखील नुकसान झाले होते. जिल्हाधिकार्यांच्या समितीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याच्या आदेश दिले होते. हे सर्वेक्षण झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यामुळे पिक विमा देण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे.
नांदेड तालुका मध्ये सोयाबीन घट टक्के मध्ये पुडील प्रमाणे:
अर्धापूर ५५.०० , मुदखेड ६१.६७ , बिलोली ६१.९८ , धर्माबाद ६१.७४, नायगाव ६०.०० , मुखेड ६०.३७ , कंधार ६१.६९, लोहा तालुक्यामध्ये ६४.००, हदगाव ५९.७५ , हिमायत नगर ६६.६५, भोकर ६४.७३, उमरी ६०.२७ , देगलूर ६०.७२, किनवट ६८.७९ , माहूर ६७.१९ टक्के सरासरीच्या उत्पादनामध्ये घट अपेक्षित आहे.
जिल्हा समितीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आहे आणि या अनुषंगाने हि अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. जेणेकरून शेतकर्यांना पिक विमा मंजूर झाला तर २५ टक्के अग्रिम रक्कम देण्यात येईल. नांदेड जिल्ह्याची सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये लवकरच सूचना देण्यात येणार आहेत.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :