ताज्या बातम्या

Milk Price | ऐन दिवाळीच्या तोंडावर अमूलने केली दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ; इतर कंपन्याही दरवाढ करण्याची शक्यता

Milk Price | ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर दुधात दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्यांना (Lifestyle) चांगलाच झटका बसण्याची शक्यता आहे. अमूलने दुधाच्या दरात (Milk Price) पुन्हा वाढ केली आहे. कंपनीने दिल्लीत लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. फुल क्रीम दूध आता 61 ऐवजी 63 रुपये प्रतिलिटर झाले आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. यापूर्वी 17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या दरात (Financial) 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणारं तीन टप्प्यात; आधार प्रमाणीकणानंतर ‘या’ तारखेपासून होणार वितरीत

कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की त्यांनी आपले फुल क्रीम दूध आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. दुधाच्या दरात ही वाढ गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी करण्यात आली आहे. अमूलने (Amul Dairy) तिसऱ्यांदा अशाप्रकारे दुधाच्या दरात वाढ केली आहे. मात्र, दुधाच्या दरवाढीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

वाचा : नुकसानग्रस्तांची दिवाळी गोड! निकषात न बसणाऱ्या ‘या’ 9 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 755 कोटींचा निधी वितरीत

याआधी दुधाचे भाव कधी वाढले?
अमूल आणि मदर डेअरीने याआधी ऑगस्टमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर दरवाढीची भरपाई देण्याच्या नावाखाली दुधाच्या दरात वाढ करण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात दुधाचे दर वाढले होते. आज पुन्हा भाव वाढले आहेत.

वाचा : जनावरांची गर्भधारणा तपासण्यासाठी प्रेग्नेंसी किट विकसित! केवळ ‘इतक्या’ दिवसांतच होणार खात्रीशीर तपासणी, जाणून घ्या सविस्तर

सणांच्या आधी हा निर्णय सर्वसामान्यांसाठी (Lifestyle) मोठा धक्का मानला जात आहे. देशातील सर्वाधिक खाल्ल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांपैकी दूध हे एक आहे. त्याचबरोबर या दरवाढीमुळे लोकांच्या बजेटवर परिणाम होणार असल्याचेही बोलले जात आहे. अमूलनंतर आता इतर कंपन्याही या सणासुदीच्या काळात दुधाच्या दरात वाढ करू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: On the eve of Diwali, Amul increased the price of milk by Other companies are also likely to increase the price

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button