कृषी बातम्या

Cotton Rate | शेतकऱ्यांनो दिवाळी गोड करा, पण कापसाची विक्री थोडीच करा; कारण आगामी काळात कापसाला मिळणार ‘इतका’ दर

Cotton Rate | सध्या खरिपातील पिके काढणीला आली आहे. हंगामातील प्रामुख्याने शेतीत (Agriculture) घेतली जाणारी पिके म्हणजे कापूस होय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महागाईचा (Financial) फटका बसून मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. ज्याचा कुठे ना कुठे फटका भारतीय बाजारपेठेला बसत आहे. तर दुसरीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग त्यासाठी खर्च (Lifestyle) हा आलाचं. आता हाच खर्च करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री (Cotton Rate) करू शकतात. मात्र दिवाळीसाठी लागणाऱ्या खर्चाएवढ्या च कापसाची विक्री करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया याच काय कारण आहे.

वाचा : शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणारं तीन टप्प्यात; आधार प्रमाणीकणानंतर ‘या’ तारखेपासून होणार वितरीत

गरजेपुरत्याच कापसाची करा विक्री
दिवाळीच्या मुहूर्तावर खर्च लागेल तितक्याच कापसाची विक्री करावी. विनाकारण बाजारात संपूर्ण कापूस आणू नये. यामुळे कापसाची आवक बाजारात आणखी वाढेल. ज्याचा परिणाम कापसाच्या दरावर (Cotton Rate) होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई करू नये, असा सल्ला जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर अमूलने केली दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ; इतर कंपन्याही दरवाढ करण्याची शक्यता

आगामी काळात मिळेल का कापसाला दर?
यंदा देशात 128 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी करणेत आलीय. तर अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाल आहे. मागील हंगामात कापसाला 14 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर कापसाचे दर सध्या 7,500 ते 8,000 रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. म्हणजेच यंदा कापसाला कमी दर मिळतोय.

वाचा : आनंदाची बातमी! कापसाला प्रतिक्विंटल 11 हजारांचा मिळाला भाव; जाणून घ्या आगामी काळात कसा असेल बाजारभाव?

तर दुसरीकडे सध्या सुत गिरण्या देशाल 55 ते 60 टक्के सूतगिरण्या पुर्णपणे बंद आहेत. त्यामुळे कापसाची मागणी घटली आहे. मात्र आगामी काळात सुत गिरण्या चालू झाल्या की कापसाची मागणी वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घाई न करता टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळेल. तर तज्ञांच्या मते यंदा कमीत कमी कापसाला 8 हजार ते 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळू शकतो. तर हा दर जास्तीत जास्त वाढूही शकतो.

यंदा बाजारात सध्याचे सरासरी दर
राज्यात 7,500 ते 8,400 रुपये दक्षिण भारत 7,600 ते 10,200 रुपये तर उत्तर भारत 7,800 ते 8,400 रुपये दर मिळत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers make Diwali sweet, but sell cotton a little; Because cotton will get ‘so much’ price in the future

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button