lang="en-US"> Astrology | दीड महिन्यात 'या' राशींच्या लोकांना होणार मोठा लाभ ! दिसणार हे मोठे बदल -

Astrology | दीड महिन्यात ‘या’ राशींच्या लोकांना होणार मोठा लाभ ! दिसणार हे मोठे बदल

Astrology |लोकांचा ज्योतिषशास्त्रावर विशेष विश्वास असतो. ज्योतिषशास्त्र आपल्याला भविष्याबाबत कल्पना देत असते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. याचा प्रभाव सर्व राशींवर शुभ-अशुभ स्वरूपात दिसून येऊ शकतो. तसेच काही राशींवर असणाऱ्या ग्रहांच्या स्वामित्वानुसार त्यांना नेमका कसा प्रभाव जाणवू शकतो याचे स्वरूप बदलू शकते.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, काल (ता.३०) वैभव, संपत्ती व प्रेम यांचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह हा कर्क राशीत प्रवेश घेण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढील दीड महिना म्हणजेच ६ जुलैपर्यंत शुक्रदेव याठिकाणी असणार आहे. त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश घेणार आहे. मात्र कर्क राशीतील प्रभावामुळे तीन राशींना येत्या काळात अमाप धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

१) मेष रास (Aries Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना शुक्राचे गोचर अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. शुक्र देव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत चौथ्या स्थानी कायम असणार आहेत. हे स्थान जमीन, घर व वाहन यांचे स्थान मानले जाते. यामुळे येत्या ६ जुलै पर्यंत आपल्या कुंडलीत या तिन्ही गोष्टींच्या खरेदीचे योग आहेत. आपल्याला संतती सुख लाभण्यातील अडथळे दूर होऊ शकतात. याकाळात अनोळखी लोकांशी फार उत्तम संबंध जुळण्याची शक्यता आहे. मात्र कोणावर सुद्धा डोळे झाकून विश्वास टाकू नका.

२) मिथुन रास (Gemini Zodiac)

काल (ता.३०) शुक्राने कर्क राशीत गोचर केले असून मिथुन राशीच्या गोचर कुंडलीत दुसऱ्या स्थानी येणार आहे. हे स्थान धन व स्वभावाचे स्थान मानले जाते. शुक्राच्या गोचरासह आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे पण याचसह आपल्याला स्थलांतरित होण्याची संधी मिळू शकते. आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होऊ शकते. आपल्या कुंडलीत संसार सुख दिसून येत आहे. ६ जुलैपर्यंतचा कालावधी एखाद्या धार्मिक कार्यासाठी शुभ ठरू शकतो. अशातच शनीसुद्धा आपल्याला लाभदायक ठरत असल्याने सुख व समृद्धी अनुभवता येऊ शकते.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

३) मीन रास (Pisces Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह आपल्या राशीच्या गोचर कुंडली पाचव्या स्थानी भ्रमण करत आहेत. हे स्थान संगतीत, बुद्धी, विवेक व रोमान्सचे स्थान म्हणून ओळखले जाते. साहजिकच यानुसार शुक्रदेवाची कृपा सुखांशी गाठ घालून देऊ शकते. तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याचे बळ मिळू शकते पण यावेळी स्वतःचे मूळ विसरण्याची चूक करू नका. प्रेमाची नाती आणखी गोड होऊ शकतात, धार्मिक कार्यातील आवड वाढण्याची शक्यता आहे. तुमचे डोके थंड व वाणी निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करा.

According to astrology next one and half month will be beneficial for aries, gemini and pisces zodiac

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Exit mobile version