ताज्या बातम्या

Maratha Reservation | अखेर ! मनोज जरांगे पाटलांनी पाच दिवसानंतर पाणी पिले पन ; आता पुढच पाऊल काय ?

Maratha Reservation | Sheikh! Manoj Jarange Patal drank water for five days; Now what is the next step?

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसानंतर आज पाणी प्याले. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या पाच दिवसात त्यांनी अन्नच काय पाणीही घेतलं नाही. त्यामुळे ( Maratha Reservation) जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली होती.

जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना भेटायला छत्रपती संभाजीराजे आले होते. संभाजीराजे यांनी जरांगे पाटील यांना पाणी घेण्याचा आग्रह धरला होता. कोल्हापूरच्या गादीचा मान आणि छत्रपतीच्या घराण्याचा मान म्हणून त्यांनी पाण्याचा घोट घेतला. त्यानंतर त्यांनी पाण्याच्या थेंबालाही हात लावला नव्हता. थेट आज समाजाच्या आग्रहास्तव त्यांनी पाणी घेतलं.

मनोज जरांगे पाटील यांची आज दुपारी पत्रकार परिषद झाल्यानंतर मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले. एक अंध कार्यकर्ता ढसढसा रडायला लागला. तो धायमोकलून रडत होता. खामगावचा हा कार्यकर्ता आहे. त्याने जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अर्ध समाधी घेतली. त्याने 48 तास स्वत:ला त्याच्याच शेतात गाडून घेतलं. त्यानंतर तो आंदोलन स्थळी येऊन रडू लागला. जरांगे पाटील यांनी पाणी प्यावं असा आग्रह त्याने धरला. त्याच्या या मागणीला उपस्थिांनी पाठिंबा दिला.

वाचा : Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात जुंपली; 10 दिवसांत आरक्षण दिले नाहीतर…

“लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे,” असं लिहिलेली पोस्टर्स झळकावण्यात आली. जरांगे पाटलांना काही झालं तर नेत्यांना महाराष्ट्रात निवडणूक नव्हे, जिल्ह्यात कायमची बंदी करू, असा इशारा देण्यात आला.

सर्वांचा हा आग्रह पाहून जरांगे पाटील यांना आपला पण तोडावा लागला. सर्वांच्या विनंतीचा मान त्यांनी ठेवला. “तुमच्या विनंतीचा मी मान ठेवतो. मी पाण्याचा घोट घेतो. पण माझ्या उपोषणावर ठाम राहील. उपोषण सुरूच राहील,” असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांना पाणी देण्यात आलं.

जरांगे पाटील यांनी पाच दिवसानंतर पाण्याचा घोट घेतल्याने मराठा समाजात समाधान व्यक्त होत आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी उपोषण सुरूच ठेवल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी वाढली आहे.

नवी बातमी

जरांगे पाटील यांनी पाणी प्याल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना पोटदुखी कमी झाली आहे. मात्र, त्यांना अजूनही थकवा जाणवत आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा :

Web Title : Maratha Reservation | Sheikh! Manoj Jarange Patal drank water for five days; Now what is the next step?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button